डोंबिवलीत अवैध शस्त्र पुरवठा करणारा अटकेत

संजीत वायंगणकर
गुरुवार, 29 जून 2017

डोंबिवली (ठाणे): डोंबिवली-कल्याण मधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केल्याने अनेक गुन्ह्यांचे धागेदोरे मिळण्याची शक्‍यता आता वाढली आहे.

दिव्या पासून अंबरनाथ-बदलापूर पर्यंतच्या गुन्हेगारांना पिस्तोल व रिव्हॉल्व्हरचा पुरवठा आवैधरित्या करणाऱ्या आजमगाढच्या तस्कराच्या ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण शाखेने मुसक्‍या बांधण्यात यश मिळविले. याने उत्तरप्रदेशातील आजमगाढ येथून आणलेली जिवंत काडतुसांसह 4 पिस्तुले क्राईम ब्रॅंचने हस्तगत केली आहेत.

शफीक हाबीब अन्सारी (22) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव असून, तो भिवंडी तालुक्‍यातील आमपाडा येथे असलेल्या तय्यब मस्जिदच्या मागे राहणारा आहे. कल्याण-शिळ क्रॉस रोड वर बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या काटई नाक्‍यावर शस्त्र साठ्यासह तस्कर येणार असल्याची माहिती कल्याण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना खबरीकडून मिळाली होती. त्यानुसार सपोनि संतोष शेवाळे, फौजदार पवन ठाकूर, फौजदार नितीन मुधगुन, दत्ताराम भोसले, विलास मालशेटे, राजेंद्र खिलारे आणि अजित राजपूत या पथकाने बुधवारी संध्याकाळ पासून नाक्‍यावर जाळे पसरले होते. जवळपास तासाभराच्या प्रतिक्षेनंतर एक तरूण या नाक्‍यावर आला. पोलिसांनी चोहो बाजूंनी त्याला घेराव घातला. पोलिसांनी घेतलेल्या अंगझडतीत त्याच्याकडे काही रकमेसह आजमगढ-कल्याण असे प्रवासाचे तिकीट सापडले.

पाठीवरील सॅकची झडती घेतली असता कापडी पिशवीत निळ्या रंगाच्या जीन्स पॅंटीत गुंडाळून ठेवलेली 4 देशी बनावटीची पिस्तुले आणि प्लास्टिकच्या पिशवीत 4 जिवंत काडतुसे आढळून आली. या सर्व शस्त्रास्त्रांची बाजारपेठेत 60 हजार किंमत आहे. या प्रकरणी हवालदार दत्ताराम भोसले यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अन्सारी यास आज (गुरूवार) कल्याण न्यायालयात हजर केले असता या तस्कराला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
तीन दिवसांच्या बलात्कारानंतर महिलेस खावे लागले स्वत:चे बाळ...
लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
ऑनलाईन असे जोडा ‘आधार’ आणि ‘पॅन कार्ड’
मी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी
Web Title: thane news one areested for Illegal weapon