मद्यपी चालकाची पोलिसांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

ठाणे - तीन हात नाक्‍यावरील सिग्नल तोडून जाणाऱ्या वाहनचालकास अडवून त्याची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट करत असताना मद्यपीने थेट पोलिस अधिकाऱ्यालाच मारहाण केली. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.  

ठाणे - तीन हात नाक्‍यावरील सिग्नल तोडून जाणाऱ्या वाहनचालकास अडवून त्याची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट करत असताना मद्यपीने थेट पोलिस अधिकाऱ्यालाच मारहाण केली. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.  

संदीप आंधळे (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील सर्वाधिक गर्दीच्या तीन हात नाक्‍यावर असलेला सिग्नल तोडून जाण्याचा वाहनचालक संदीप आंधळे प्रयत्न करीत होता. त्या वेळी त्याला पोलिसांनी अडविले. त्याने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तो मद्यप्राशन करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावर त्यांची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट घेण्यासाठी त्याला चौकीत नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याने पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की सुरू केली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी शशिकांत घिवारे यांनी तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, सुमारे दोन वर्षांपूर्वी ठाण्यातीलच नितीन कंपनी येथे सिग्नल तोडणाऱ्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली होती. 

Web Title: thane news police

टॅग्स