पोलिसांसह कुटुंबीयांसाठी मोबाईल मेडिकल व्हॅन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

ठाणे -  कायदा सुव्यवस्था राखणे, मिरवणुकांचा बंदोबस्त, बांधकामांवरील कारवायांना संरक्षण, नाकाबंदी आणि ही सर्व कामे करत कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे अशा कामांत गुंतलेल्या पोलिसांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी ‘जन स्वास्थ्य कल्याण वाहिका’ या मोबाईल मेडिकल व्हॅनची सेवा सुरू करण्यात आली. इंडिया बुल्स फाऊंडेशनतर्फे मेडिकल व्हॅन देण्यात आली असून पोलिस ठाणी, पोलिस मुख्यालय, पोलिस वसाहतींमध्ये जाऊन तेथील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी केली जाणार आहे.

ठाणे -  कायदा सुव्यवस्था राखणे, मिरवणुकांचा बंदोबस्त, बांधकामांवरील कारवायांना संरक्षण, नाकाबंदी आणि ही सर्व कामे करत कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे अशा कामांत गुंतलेल्या पोलिसांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी ‘जन स्वास्थ्य कल्याण वाहिका’ या मोबाईल मेडिकल व्हॅनची सेवा सुरू करण्यात आली. इंडिया बुल्स फाऊंडेशनतर्फे मेडिकल व्हॅन देण्यात आली असून पोलिस ठाणी, पोलिस मुख्यालय, पोलिस वसाहतींमध्ये जाऊन तेथील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी केली जाणार आहे. सध्या ठाणे पोलिसांसाठी दोन गाड्या देण्यात आल्या असल्या, तरी पोलिस आयुक्तालयाचा पसारा लक्षात घेता आणखी दोन गाड्यांची आवश्‍यकता पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी व्यक्त केली आहे. 

इंडिया बुल्स फाऊंडेशनने जन स्वास्थ्य कल्याण वाहिका या उपक्रमाची सुरुवात नोव्हेंबर २०१६ ला केली. संस्थेच्या ७ मोबाईल मेडिकल व्हॅनद्वारे मुंबई पोलिसांच्या झोन १, २, ३ आणि पोर्ट झोनमध्ये ही सेवा सुरू आहे. या मेडिकल व्हॅनच्या माध्यमातून मुंबई पोलिसांच्या १ लाख १७ हजार ३२९ पोलिस आणि कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली आहे. ठाणे शहरात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून दोन वाहने गुरुवारी पोलिसांच्या सेवेसाठी देण्यात आली. प्राथमिक आरोग्य तपासणी आणि सुविधा या व्हॅनमधून दिल्या जातात. त्यासाठी आवश्‍यक मेडिकल साहित्यही या व्हॅनमध्ये आहे. यामध्ये डॉक्‍टर आणि नोंदणीकृत फार्मासिस्टची नियुक्ती करण्यात आली आहे.  ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह, सहपोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलिस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त मुख्यालय एक ठाणे शहर प्रियंका नारनवरे, इंडियन बुल्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन दिव्या गेहलोत, अपर पोलिस आयुक्त पश्‍चिम विभाग सत्यनारायण आणि पोलिस उपायुक्त मुख्यालय दोन संदीप पालवे आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: thane news police Mobile Medical Van