ठाणे जिल्हा प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा...

ठाणे जिल्हा प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा...

सावधानता बाळगावी, पाण्याचा निचरा करावा

ठाणे : जिल्ह्यातील आपल्या हद्दीतील जुन्या व धोकादायक अवस्थेतील पुलांवरून वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहील हे पाहण्याच्या सुचना जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून सर्व पालिका, जिल्हा परिषद, तहसीलदार, प्रांत कार्यालये, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आल्या आहेत. २९ ऑगस्ट रोजी हवामान खात्याने उत्तर कोकण भागात २४ तासांत अतिशय जोरदार वृष्टी होईल, असे कळविल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने खबरदारीचा इशारा दिला आहे.

पुलावरून पाणी जात असल्यास वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात यावी तसेच सखल भागातील पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे या सूचनेत म्हटले आहे. आपल्या विभागातील बचाव पथक, बचाव साहित्य, रुग्णवाहिका या तयारीत ठेवाव्यात तसेच डॉक्टर्स आणि सहायक यांची सेवाही लगेच उपलब्ध होईल असे पाहावे, आपत्कालीन प्रसंगी स्थलांतरण करण्यासाठी तयारी ठेवावी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास दररोज २५३०१७४०, २५३८१८८६६ किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ परिस्थितीचा अहवाल द्यावा असे या प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

ठाणे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस
१ जूनपासून आत्तापर्यंत ठाणे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कितीतरी जास्त पाऊस पडल्याचे कळवा- ठाणे च्या हायड्रोलॉजी डिव्हिजनच्या माहितीवरून दिसते. या उपविभागाच्या  ठिकठिकाणी असलेल्या स्टेशन्सने संकलित केलेली माहिती तसेच टक्केवारी कंसात पुढीलप्रमाणे आहे:
अंबेपाडा, शहापूर (१२३.११%), भातसानगर, शहापूर (११२.९९%), साकुर्ली, शहापूर (११२.४०%), शेलवली, शहापूर ( ९९.५३%),शेंद्रूण, शहापूर( ११३.१५%), टेंभुर्ली, शहापूर (८९.२५%), बंधीवली, मुरबाड (११४.४०%), बेलपाडा मुरबाड ( १२४.७०%), भगदळ मुरबाड ( ११३.२०%), धसई मुरबाड ( १२०.४०%), दुधनोली मुरबाड ( १५०.८०%), कळंबड मुरबाड (१०८.६०%), कोचरा मुरबाड ( ९५.५३%), कुंडाची वाडी मुरबाड ( १२८.२०%), लोहारवाडी मुरबाड ( ८६.४०%), मोरोशी मुरबाड ( १०१.५०%), फांगलोशी मुरबाड ( १०१.२०%),टेमगाव मुरबाड ( ११०.१०%), ठुणे मुरबाड (१०८.६०%), तुळज मुरबाड ( १०७.०%), उंबरपाडा मुरबाड ( १०७.८०%), वालीवरे मुरबाड ( १०५.००%), धामणी भिवंडी (१११.९२%), दुगड भिवंडी ( ९६.६५%),   पिंपळास भिवंडी ( १५६.२८%), पुंडास भिवंडी ( ९१.८१%), ठाणे येऊर ( ९१.३७%)

अतिवृष्टीमुळे झालेली हानी...
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार :
ठाण्यातील इंदिरा नगर येथे १ मुलगा आणि १ मुलगी नाल्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले होते, त्यापैकी कोरम मॉलजवळ मुलाचा मृतदेह सापडला मात्र मुलीचा अद्याप पत्ता नाही.
कळवा पूर्व येथे खाडी नजीकच्या शांतीनगर नाल्यात रंजिता शेख ३२ या महिलेचा मृतदेह सापडला.
मानपाडा प्रेस्टीज कंपनीची भिंत कोसळून ११ घरांचे नुकसान झाले. रेणू आणि कांचन यादव या महिला जखमी झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com