ठाणे कारागृहात आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

22 वर्षीय आशिष बरणवाल हा ठाणे कारागृहात 19 जुलैपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. वसईमधील वाळुंज पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठाणे - ठाणे मध्यवर्ती कारागृहात बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला आरोपी आशिष बरणवाल याने पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय आशिष बरणवाल हा ठाणे कारागृहात 19 जुलैपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. वसईमधील वाळुंज पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पहाटे दोनच्या सुमारास कारागृहातील संडासच्या गजला टी शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. 

आशिषने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Thane news prisoner Suicide in Thane jail