पालघर, ठाणे जिल्ह्यात पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

मोखाडा - ठाणे आणि पालघर जिल्ह्यांच्या काही भागांत गुरुवारी (ता. १) जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उन्हाच्या झळांनी त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. पालघरमध्ये मोखाडा, विक्रमगडमध्ये जोरदार सरी कोसळल्या.   ठाणे येथे मुरबाड, शहापूर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. विक्रमगडमध्ये उन्हाळी भातशेताची कापणी अंतिम टप्प्यात आहे. या पावसात भाताचे भारे भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

मोखाड्यात मॉन्सूनपूर्व पावसाने दीड तास हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या या पावसामुळे घरे शाकारणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. ठिकठिकाणी वीजखांब कोसळल्याने बराच वेळ वीज गायब झाली होती. भीषण पाणीटंचाई असलेल्या गाव-पाड्यांनाही मोठा दिलासा मिळाला. मेमध्ये मोखाडा तालुक्‍यात धूळवाफ्यांवर खरीप हंगामाची पेरणी केली जाते. या वर्षी पेरणी पूर्ण झाली असून या पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून महावितरणने प्रत्येक शुक्रवारी दुरुस्तीचे काम केले होते; मात्र महावितरणने केलेल्या कामाचा फज्जा पहिल्याच पावसात उडाला आहे. 

किन्हवलीत घरांचे छप्पर उडाले
 किन्हवली परिसरातही गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर शेणवे-किन्ववली मार्गावरील विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मळेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय, नथू सदू जाधव, रामचंद्र पोसू शिर्के यांच्या घरावर वीज कोसळून उपकरणांचे नुकसान झाले. परिसरातील अनेक गावांना वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला.

Web Title: thane news rain palghar