श्रावणसरींनी ठाण्याला झोडपले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंब्रा येथील कौसा तलावात रफिक सारंग (57) याचा मृतदेह आढळल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. ठाण्याच्या बाजारपेठेत गटारे व मलवाहीन्यावरील झाकणांवर कचरा अडकल्याने रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत होते. कौसा, कादर पॅलेस परिसरातील नाल्यात इमारतींचा राडारोडा पडुन पाणी अडल्याने परिसरात पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या.

ठाणे : सकाळपासुन कोसळत असलेल्या श्रावणसरींनी ठाणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटनांसह वृक्ष उन्मळून पडले.

दुपारपर्यत तब्बल 72 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, मुंब्रा येथील कौसा तलावात रफिक सारंग (57) याचा मृतदेह आढळल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. ठाण्याच्या बाजारपेठेत गटारे व मलवाहीन्यावरील झाकणांवर कचरा अडकल्याने रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत होते. कौसा, कादर पॅलेस परिसरातील नाल्यात इमारतींचा राडारोडा पडुन पाणी अडल्याने परिसरात पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या. तर, वृंदावन सोसायटी,कळवा, सहयाद्री सोसायटी भागातही पाणी तुंबल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

दरम्यान, सकाळपासुनच पावसाची रिपरिप सुरू असल्याने घोडबंदर रोडसह शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुक कोंडी झाली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Thane news rain in Thane