शिक्षिकेच्या पतीने केला भरदिवसा विवाहितेवर बलात्कार,

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

विटावा येथे राहणारी ही 19 वर्ष वयाची ही पीडित मुलगी शिकवणी वर्गातील आपल्या सहा वर्ष्याच्या पुतणीला आणायला शुक्रवारी साडेबाराच्या सुमारास गेली होती. तेव्हा शिक्षिकेचा पती उपेंद्र मकवाना याने या पीडित मुलीला आपल्या घरात बोलविले. गेल्या काही वर्षांपासून ओळखीचे असल्याने ती घरात गेली. तेव्हा तिचा हात पकडून तिला स्वयंपाक घरात घेऊन गेला. तिला दमदाटी करून जबरदस्तीने तिचे कपडे फाडून धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.

कळवा : सहा वर्ष्याच्या पुतणीला शिकवणी वर्गाहुन आणायला गेलेल्या 19 वर्षीय विवाहित तरुणीवर शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेच्या पतीने बलात्कार केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विटावा सूर्यनगर परिसरात घडली कळवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

विटावा येथे राहणारी ही 19 वर्ष वयाची ही पीडित विवाहिता शिकवणी वर्गातील आपल्या सहा वर्ष्याच्या पुतणीला आणायला शुक्रवारी साडेबाराच्या सुमारास गेली होती. तेव्हा शिक्षिकेचा पती उपेंद्र मकवाना याने या पीडित मुलीला आपल्या घरात बोलविले. गेल्या काही वर्षांपासून ओळखीचे असल्याने ती घरात गेली. तेव्हा तिचा हात पकडून तिला स्वयंपाक घरात घेऊन गेला. तिला दमदाटी करून जबरदस्तीने तिचे कपडे फाडून धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. तसेच घरी न सांगण्याची दमबाजी केली व उद्या परत ये मी गर्भ पाडून देतो असे सांगितले.

पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यावर तिच्या पालकांनी मकवाना विरोधात तक्रार दाखल केली. कळवा पोलिसांनी शनिवारी रात्री आरोपी उपेंद्र मकवाना याला अटक केली आहे. या घटनेची कळवा पोलिस अधिक चौकशी करीत आहेत.

Web Title: Thane news rape in kalva