आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी आजपासून अर्ज प्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

ठाणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 2018-2019 या शैक्षणिक वर्षासाठी शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू होत असून उद्यापासून (ता.24) 12 फेब्रुवारीदरम्यान पालकांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी केले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी शिक्षण विभागाने संबंधित विभागात सूचना केल्याअसून पालकांना पाल्यासाठी प्रवेश अर्ज भरताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असा विश्‍वास यादव यांनी व्यक्त केला आहे. यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये घटस्फोटित, विधवा महिला, अनाथ बालके व दिव्यांग बालके यांनाही प्रवेश मिळणार आहे. 

जिल्ह्यातील शाळांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना शाळांना करण्यात आली आहे. प्रवेशाची पहिली सोडत 14 आणि 15 फेब्रुवारीला निघणार असून पाल्याच्या पालकांनी 16 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान प्रवेश निश्‍चित करायचा आहे, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी कळवले आहे. पालकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास 022-33494333 या क्रमांकावर संपर्क साधावा. येत्या शैक्षणिक वर्षापासून आरटीई प्रवेश प्रक्रिये अंतर्गत विधवा महिला, घटस्फोटित महिला, दिव्यांग बालके, अनाथ मुले यांनाही प्रवेश दिला जाणार आहे. या मुलांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. कागदपत्रांची तसेच माहितीचा अभाव असल्याने अनेक मुलांना प्रवेश नाकारला जात असे; परंतु आता या मुलांच्या प्रवेशाचाही मार्ग सुकर झाल्याने पालकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्‍वास यादव यांनी व्यक्त केला. 

प्रवेशासाठी आवश्‍यक पुरावे 
आरटीईअंतर्गत प्रवेश अर्ज भरण्यासाठी रहिवासी पुराव्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, टेलिफोन बिल, वाहन चालवण्याचा परवाना यापैकी एक ग्राह्य धरले जाणार आहे. कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला), जन्मदाखला, बालकाचे पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र द्यायचे आहे. 

पुन्हा अर्जाची संधी 
प्रवेशाच्या पहिल्या सोडतीमध्ये पाल्याचा नंबर लागला नाही, तर दुसरी आणि तिसरी सोडतही निघते. दुसऱ्या सोडतीसाठी पालकांनी 16 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान, तर तिसऱ्या सोडतीसाठी 9 ते 22 मार्च या कालावधीत पुन्हा अर्ज करावयाचा आहे. 

Web Title: thane news RTE education