ठाण्यात देणाऱ्यांचे हात हजार...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

ठाणे - वंचित घटकांना आवश्‍यक गृहपयोगी वस्तू देण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाला रविवारी शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील शेकडो जणांनी घरातील निरुपयोगी परंतु वापरण्याजोग्या वस्तू शेअर फाऊंडेशनला दिल्या आणि या संस्थेच्या माध्यमातून शहरातील ४०० ते ५०० गरजूंनी त्याचा लाभ घेतला. नागरिकांचा प्रतिसाद पाहून शुक्रवारी (ता.९) वागळे इस्टेट परिसरातील गरीब वस्तीत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

घरातील अनावश्‍यक वस्तू गरजूंना दान करण्याचे आवाहन करणारा उपक्रम ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभाग आणि सामाजिक संस्था शेअर फाऊंडेशनने राबवला. या उपक्रमांतर्गत दान करण्यात आलेल्या वस्तू गरजू व्यक्तींना देण्याचे काम महापालिका प्रशासन आणि शेअर फाऊंडेशन करत आहे. महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारीही या उपक्रमात सहभागी होऊन तो अधिक लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत ठाण्यातील कचराळी तलाव परिसरात या वस्तू गरजूंना देण्यात आल्या. शहरातील वेगवेगळ्या वस्त्यांमधील गरजूंना या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. ४०० ते ५०० नागरिकांनी येथे येऊन या उपक्रमाचा लाभ घेतला; तर काही नागरिकांनीही तेथे येऊन आपल्याकडील वस्तूंचे दान केले. 

ठाण्यातील कोलशेत परिसरातील विराज ग्रीन व्हॅली येथे शेअर फाऊंडेशन ही संस्था कल्चरल ऑफ शेअर या उद्देशाने कार्यरत असून या संस्थेने ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम राबवला. या उपक्रमातून गरजूंना चप्पल, बॅग, छत्री, भांडी, कपडे टी-शर्ट, जीन्स, फ्रॉक, पंजाबी सुट, साडी, बेडशीट आणि टॉवेल यासारख्या उपयोगी वस्तू नागरिकांकडून जमा करून देण्यात आल्या. भविष्यातही हे तरुण हा उपक्रम अधिक व्यापक पद्धतीने साजरा करणार असून त्यांना पूर्ण पाठिंबा देणार आहे. 
- संजय केळकर, आमदार

Web Title: thane news social Household