एसटी संपामुळे मुरबाड बाजारपेठेत मंदी

मुरलीधर दळवी
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

कर्मचाऱ्यांची दिवाळी बस आगरातच
मुरबाड आगरामध्ये 70 टक्के कर्मचारी तालुक्यातील आहेत तर 30 टक्के कर्मचारी बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत काल पासून हे सर्व कर्मचारी वर्गणी काढून मुरबाड आगारातील दत्त मंदिराजवळ एकत्रितपणे स्वयंपाक करून जेवत आहेत. आमची दिवाळी येथेच आहे असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मुरबाड : एसटी बस बंद असल्याने मुरबाड बाजारपेठेत आज मंदीचे वातावरण होते किराणा सामान, फटाके, कपडे, मिठाई, आकाश कंदील अशा सर्व दुकानांमध्ये गर्दीच झाली नाही. हॉटेल, वडापाव, भजी विकणाऱ्या छोट्या दुकानांमध्ये मंदीचे वातावरण होते.

दिवाळीनिमित्त खेड्या पाड्यातून तालुक्याच्या ठिकाणी येणारे ग्राहक आज बुधवारी एसटी बस बंद असल्याने आलेच नाहीत. त्यामुळे व्यवहार थंड झाल्याचे किराणा व्यापारी संतोषकाका खडकबाण यांनी सांगितले. लोकांना एसटी बस बंद असल्याचे माहित असल्याने तालुक्याला येण्याऐवजी ते सरळगाव, धसाई, म्हसा, टोकावडे अशा जवळच्या बाजारपेठेत खरेदी करून स्थानिक जीप, मॅजिक अशा खाजगी वाहनाने घरी परतले. 

मुरबाड बसस्थानकातून काल मंगळवारी एकही बस सुटली नसल्याने व बुधवारीही संप चालूच असल्याचे प्रसार माध्यमातून समजल्याने बस स्थानकावर आज प्रवाशीच आले नाहीत. फक्त काही संपकरी एसटी कर्मचारी व पोलिस बस स्थानकात होते.

कर्मचाऱ्यांची दिवाळी बस आगरातच
मुरबाड आगरामध्ये 70 टक्के कर्मचारी तालुक्यातील आहेत तर 30 टक्के कर्मचारी बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत काल पासून हे सर्व कर्मचारी वर्गणी काढून मुरबाड आगारातील दत्त मंदिराजवळ एकत्रितपणे स्वयंपाक करून जेवत आहेत. आमची दिवाळी येथेच आहे असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Thane news st strike in murbad