व्हॉट्‌सऍपवरील बदनामीमुळे दिवा येथे युवतीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

ठाणे - माध्यमांवर बदनामी करणारे संदेश एखाद्या व्यक्तीला आत्महत्या करण्यासही कसे भाग पाडू शकतात, याचे प्रत्यंतर देणारा एक प्रकार ठाण्यात उजेडात आला आहे. या घटनेत आत्महत्या करणारी 16 वर्षांची मुलगी आहे आणि तिला संदेश पाठवणारी तिचीच मैत्रीण आहे. या प्रकाराला प्रेमाचा तिसरा कोनही कारणीभूत आहे. 

आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव मयूरी पाटील (वय 16) असे आहे. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे डिसेंबरमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मयूरीचे ज्या तरुणावर प्रेम होते, त्याच्यावरच तिची मैत्रीण दिव्या राणे (वय 17) हिचेही प्रेम होते. तिने असूयेतून मयूरीला व्हॉट्‌सऍपवर अश्‍लील संदेश पाठवले. ते वाचल्यावर तिने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी दिव्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

दिवा पश्‍चिमेकडील बालदानगर येथे राहणारी मयूरी आणि आकाश यांच्यात प्रेमसबंध होते. आकाशच्या आयुष्यात दिव्या आली. त्यावरून दोघींमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. दिव्या अनेक दिवसांपासून मयूरीला व्हॉट्‌सऍपवर अश्‍लील संदेश पाठवत होती. ते वाचून नैराश्‍य आलेल्या मयूरीने घरी पंख्याला गळफास घेऊन 9 डिसेंबरला आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तेथे 10 डिसेंबरला तिचा मृत्यू झाला.

Web Title: thane news suicide whatsapp social media