'भिडे व एकबोटेंवर कारवाईची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची '

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

ठाणे - कोरेगाव भीमाप्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, तरीही त्यांना अटक होत नाही. अटकेबाबतचा निर्णय राज्याच्या पोलिसांचा नसून गृहमंत्र्यांचा आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रिपद असूनही भिडे व एकबोटे यांच्या अटकेसाठी टाळाटाळ होत असल्याचे सांगत सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या ठाणे जिल्हा केंद्राच्या वतीने "विचारकुंकू' या उपक्रमात प्रा. नितीन आरेकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली. या वेळी त्यांनी दिलखुलास संवाद साधत परखड मते मांडली. 

सुळे म्हणाल्या, ""कोरेगाव भीमा प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे; मात्र या घटनेमागची सत्यता झाकली जाऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. समाजाने घडणाऱ्या सर्व घटनांचा व्यापक विचार करणे बंद केले आहे. जनतेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावला जात असून, विचारवंतांच्या हत्या होत आहेत. जनतेला बुलेट ट्रेन नाही, तर समान अधिकार व मोकळा श्‍वास घेण्याची मुभा हवी आहे; मात्र दुर्दैवाने तोही जनतेला घेता येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

"पद्मावत'बाबत त्या म्हणाल्या, ""एका चित्रपटासाठी आपण रस्त्यावर उतरतो; मात्र दुसरीकडे मराठी शाळा "बंद' होत असताना त्यावर बोलणारे आणि निषेध करणारे किती आहेत? सरकारने राज्यातील 113 शाळा बंदचा निर्णय घेतला याचा निषेध आहेच; पण किमान मराठी माध्यम व मराठी भाषेचा आग्रह राज्य सरकारने धरला पाहीजे.'' 

Web Title: thane news supriya sule bjp koregaon bhima case milind ekbote sambhaji bhide