तरुणीवरील अत्याचाराच्या प्रकरणातून शिक्षक निर्दोष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

ठाणे - खासगी शिकवणीच्या बहाण्याने महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार केल्याच्या आरोपातून विटावा येथील शिक्षकाची न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.

ठाणे - खासगी शिकवणीच्या बहाण्याने महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार केल्याच्या आरोपातून विटावा येथील शिक्षकाची न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.

विटावा येथील शाळेतील एका 29 वर्षांच्या शिक्षकाने खासगी शिकवणीच्या बहाण्याने अकरावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केला होता. जानेवारी 2015 ते 2016 या कालावधीत पीडित मुलीला त्याने मावळ येथील घरी नेऊन लग्नाच्या भूलथापा देत अत्याचार केला. दरम्यान, वडील आजारी असल्याचे कारण सांगून पीडित मुलीने स्वत:ची सुटका करून घेतली होती. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून शिक्षकाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश बांबर्डे यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने साक्षी-पुराव्यांअभावी शिक्षकाची निर्दोष मुक्तता केली.

Web Title: thane news The teacher was acquitted of the case against the girl