ठाण्यात अवघ्या दहा दिवसात पासपोर्ट पडताळणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

  • अर्जदाराच्या घरी जाऊन आनलाईन पध्दतीने तात्काळ पडताळणी
  • महिने-दिड महिन्याची दिरंगाई टाळण्यासाठी पोलिसांना टबचा पुरवठा

  • अर्जदाराच्या घरी जाऊन आनलाईन पध्दतीने तात्काळ पडताळणी
  • महिने-दिड महिन्याची दिरंगाई टाळण्यासाठी पोलिसांना टबचा पुरवठा

ठाणे : पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रीयेतील महत्वाचा घटक असलेल्या पोलिस व्हेरिफिकेशनसाठी नागरिकांना साधारणपणे एक ते दीड महिन्यांचा वेळ लागत असून, त्यामुळे अनेकवेळा महत्वाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होत होता. एकाच वेळी लाखो संख्येने येणाऱ्या अर्जामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवरही ताण असे हे टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. अवघ्या दहा दिवसांच्या आत पोलिस पडताळणी पुर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील सगळ्या पोलिस ठाण्यांच्या पासपोर्टसाठी चारित्र पडताळणीसाठी टॅब आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या माध्यमातून पोलिस कर्मचारी अर्जदाराच्या घरातूनच ही पडताळणी प्रक्रिया पुर्ण करून पासपोर्ट कार्यालयाकडे तात्काळ माहिती पाठवू शकणार आहे. यामुळे नागरिकांना पेपरलेस आणि जलदगतीने पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया पुर्ण करता येऊ शकते, अशी माहिती ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरात दरवर्षी एक लाखाहून अधिक नागरिक पारपत्र अर्थात पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज करत असतात. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे अर्जदाराची पडताळणी वेळेमध्ये पुर्ण होत नाही. तर कामाचा ताणामुळे प्रत्येक अर्जदाराच्या घरामध्ये जाऊन पडताळणी करण्यामध्ये बराच वेळ जातो. कागदपत्रांची माहिती आणि अन्य गोष्टींचा विचार केल्यानंतर ठाणे पोलिसांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात ही कामे पुर्ण करण्यासाठी टॅब उपलब्ध करण्याचे ठरवले. मंगळवारी १८ जुलै रोजी शहरातील सगळ्या पोलिस ठाण्यांना टॅबचा पुरवठा केला. तर अन्य ठिकामांवर दोन टॅब उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंब्रा, कळवा, शांतीनगर, डोंबिवली, महात्मा फुले चौक, मानपाडा, उल्हासनगर, वर्तकनगर, कासारवडवली या पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. या ठिकाणी महिन्याला साधारणत: ४५० ते ५०० अर्जदार दाखल होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आले असून हे काम अत्यंत सोप्या करण्यात आल आहे. यामुळे नागरिकांना कागदपत्र विरहित आणि जलद पासपोर्ट पडताळणी होऊ शकणार आहे.

ठाणे पोलिसांनी एकुम ४८ टॅब खरेदी केले आहेत. आयुक्तालयातील ३५ पोलिस ठाण्यातन प्रत्येक एक तर  गर्दीच्या ठाण्यांना दोन टॅब देण्यात आले आहे. पडताळणीच्या दिवशी टॅप घेऊन कर्मचारी अर्जदारांच्या घरी जाऊन त्यांची कागदपत्रांची पाहणी करेल. तसेच तात्काळ वरिष्ठांना पाठवून देईल. मंगळवारी एका विशेष कार्यक्रमामध्ये प्रत्येक पोलिस ठाण्याला टॅब देण्याची प्रक्रीया पोलिस आयुक्त परम बीर सिंह, पोलिस सह आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनानुसार पार पडली. पोलिस उप आयुक्त विशेष शाखेचे अंकित गोयल यांनी हा उपक्रम यशस्वी केला.  

पोलिस ठाण्यातील पासपोर्ट विभाग सुसज्ज...
पोलिस ठाण्यामध्ये पासपोर्टच्या पडताळणीसाठी येणाऱ्या नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी पोलिस ठाण्यातील हे विभाग अधिक सुसज्ज करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना वेगळ्या रंगाचे गणवेश देण्यात येणार असून, ब्ल्यू शर्ट आणि ग्रे रंगाची पॅंट अशी वेगळी रंगसंगती असणार आहे, अशी माहिती यावेळी पोलिस आयुक्तांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: thane news thane police and passport police verification