ठाणे लोहमार्ग पोलिसांनी लावला मोबाईल चोराचा छडा

दीपक शेलार
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

ठाणेः धावत्या लोकलमध्ये प्रवाश्यांचे मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्या त्रिकुटाचा छडा ठाणे लोहमार्ग पोलिसांनी लावला असून, कुणाल झांझोड उर्फ वात्मिकी फरार आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीचे 18 महागडे स्मार्ट फोन हस्तगत केले आहेत. न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत (ता. 12) पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिस उपायुक्त समाधान पवार यांनी आज (शनिवार) ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली.

दुर्गेश शुक्ला, चेतन माच्छरे उर्फ अज्जु आणि कुणाल जगताप अशी अटक आरोपींची नावे असून, सर्व ठाणे व कोपरी परिसरात राहणारे आहेत. या चोरट्यांनी धावत्या लोकलमध्ये दरवाजात उभे असलेल्या प्रवाश्यांच्या हातावर काठी सदृष्य वस्तू मारून मोबाईल हिसकावले होते. अशीच एक घटना 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास समिक्षा मार्कंडे या महिला प्रवाशाबाबत घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे चोरीचे मोबाईल न विकता या मोबाईलचे स्पेअर पार्टस मोबाईल दुरुस्तीवाला रमाकर सिंग याला मध्यस्ताकरवी विकत असत. या मोबाईल चोरांना मोक्का लावण्याचा विचार उपायुक्त पवार यांनी व्यक्त केला.

Web Title: thane news Thane railway police arrested mobile thief