सॅटीस पुलाला गळती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

ठाणे - ठाणे स्थानकात उभारण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी सॅटीस पुलाला गळती लागली आहे. पावसाचे पाणी थेट पुलाखालून मार्गक्रमण करणाऱ्या पादचाऱ्यांवर कोसळत असल्याने सॅटीसखाली प्लास्टिक कापडाचे आच्छादन लावण्याची नामुष्की ओढवली आहे. पुलाखाली ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी नियमित उभे असतात; मात्र नियमित जलवर्षावाच्या त्रासातून सुटका होत नसल्याची खंत पादचारी व्यक्त करीत आहेत.

वर्दळीच्या ठाणे स्थानकात ये-जा करण्यासाठी असलेले रस्ते अरुंद असून या रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव नसल्याने वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून २००९ मध्ये ठाणे रेल्वे स्थानकातील पश्‍चिम भागात महापालिकेने कोट्यवधी खर्चून ‘सॅटीस’ प्रकल्प उभारला. या पुलावरून पालिकेच्या टीएमटी बससह राज्य परिवहन सेवेच्या एसटी बसची वाहतूक होत आहे. पुलाखालून अन्य वाहनांना मुभा दिली आहे, तरीही प्रकल्पामुळे रेल्वे स्थानक परिसरातील कोंडी सुटलेली नाही. नियोजनाच्या अभावामुळे सॅटीस पूल असून अडचण नसून खोळंबा बनला आहे. शिवाय २०१४ मध्ये आघाडी सरकारच्या काळात सॅटीसवरील बस थांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या सोईसाठी भारतातील पहिलेच अत्याधुनिक छत उभारण्यात आले आहे; तरीही संततधार पावसात सॅटीसवर साचलेले पाणी थेट पुलाखाली झिरपत असल्याने जलवर्षावाने पादचारी त्रस्त झाले आहेत. ही गळती रोखण्यासाठी काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी व वृत्तपत्र विक्रेत्यांनी प्लास्टिकचे आवरण आच्छादून तात्पुरती व्यवस्था केली आहे. सॅटीस पुलाखाली अन्य दोन भागांत अव्याहतपणे पाणीगळती सुरू असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

वर खड्डे, खाली अंधार
सॅटीस पुलावर अगणित खड्डे पडल्याने सार्वजनिक बस वाहतुकीचे संचालन धीम्या गतीने सुरू असते; परिणामी बसच्या लांबच लांब रांगा लागून थेट बाजरपेठ आणि आलोक हॉटेलपर्यंत वाहने असतात. सॅटीसखालील दिवे नेहमीच बंद असल्याने इथे अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. यामुळे चोरांचे चांगलेच फावत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

Web Title: thane news thane railway station Satis bridge