ठाण्यातील स्वच्छतागृहे आता गुगलवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

हागणदारीमुक्त शहरासाठी ठाणे महापालिकेचे अभिनव पाऊल
ठाणे - शहरात स्वच्छतागृहांचा वापर जास्तीत जास्त वाढावा, यासाठी महापालिकेने आता गुगलची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलच्या माध्यमातून शहरातील 11 हजार 217 सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती उपलब्ध केली जाणार आहे.

हागणदारीमुक्त शहरासाठी ठाणे महापालिकेचे अभिनव पाऊल
ठाणे - शहरात स्वच्छतागृहांचा वापर जास्तीत जास्त वाढावा, यासाठी महापालिकेने आता गुगलची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलच्या माध्यमातून शहरातील 11 हजार 217 सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती उपलब्ध केली जाणार आहे.

जगभरातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती उपलब्ध करून देणारे साधन म्हणून गुगलकडे पाहिले जाते. एखाद्या गावाची माहिती, एखाद्या दिग्गज नेत्याची माहिती किंवा हॉटेल, मॉल, चित्रपटगृह आदींसह इतर माहिती देण्यासाठी प्रसिद्ध असलेले गुगल आता शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहितीही उपलब्ध करून देणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता ठाण्यातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहे गुगलवर दिसणार आहेत. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने आता पाऊल उचलले आहे. ठाणे महापालिकेंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहांना आता टॉयलेट लोकेटरद्वारे गुगलवर टाकले जाणार आहे.

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे गुगल मॅपद्वारे टॉयलेट लोकेटर बसविण्यासाठी एकूण 2 कोटी 58 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यावर नवीन करप्रणालीनुसार 18 टक्के वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागणार असल्याने त्यात आणखी वाढ होऊन हा खर्च 3 कोटी 4 लाख 440 रुपये एवढा खर्च होईल. त्यानुसार या खर्चापैकी 80 टक्के रक्कम कार्यादेश दिल्यानंतर आगाऊ देण्यात येणार असून, उर्वरित 20 टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यावर दिली जाणार आहे. त्यानुसार आता येत्या 2 ऑक्‍टोबरपर्यंत ही स्वच्छतागृहे गुगल मॅपला जोडली जाणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.

Web Title: thane news thane toilet on google