सायकलस्वार, पादचाऱ्यांसाठी वेगळी लेन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

ठाणे - ठाण्यातील तब्बल साठ टक्के नागरिक हे पादचारी असल्याने त्यांच्यासाठी सर्व्हिस रोडवर विशेष रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायकलसाठीही एक विशेष लेन दिली जाणार आहे. त्याचबरोबर शहरातील मुख्य रस्त्यांच्या शेजारीही सायकलसाठी लेन देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यानुसार पुढील सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

पादचाऱ्यांसाठी आणि सायकलसाठी वेगळी लेन तयार करण्यासाठी २४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; पण रस्त्यांचा आकार मात्र तेवढाच आहे. शहरातील मुख्य जंक्‍शनवर सकाळ-सायंकाळच्या सुमारास कोंडी होत आहे. ती फोडण्यासाठी अथवा कमी अंतर पार करण्यासाठी नागरिकांनी खासगी वाहनाचा वापर करण्याऐवजी सायकल अथवा पायी चालून ते कापावे, या उद्देशाने सॉफ्ट मॉबिलिटीचा महत्त्वांकाक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्या परिसराचे चार भाग करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात स्टेशन परिसरातील नौपाडा आणि कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातील रस्ते सुभाष पथ, छत्रपती शिवाजी महाराज पथ, गोखले रोड, राम-मारुती रोड आणि वर्तकनगर व मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रतील काही रस्ते, पोखरण रोड नं. १,२ आणि ३, देवदयानगर रस्ता, लोकपुरम व वसंतविहार, बॅरिस्टर नाथ पै रस्ता, मुल्लाबाग रस्ता आदी २४ कि.मी. रस्त्यांचे सॉफ्ट मोबिलिटी प्लॅन तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये प्रति कि.मी. एक कोटीचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार तब्बल २४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. 

असा असेल प्रकल्प
महापालिका प्रकल्पांतर्गत ठाणे शहरात पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळ्या पदपथांचे जाळे, सायकलस्वारांसाठी सायकल ट्रॅक निर्माण करणार आहे. पदपथांची सुधारणा, रेलिंग्ज, रंगीत बिटुमेनचा वापर करून सायकल ट्रॅकचा पाथ, साईनेजेस, थर्मोप्लास्टिक पेंटच्या माध्यमातून लेनिंग, जंक्‍शन्सवर पादचाऱ्यांसाठी वा सायकलस्वरांसाठी झेब्रा क्रॉसिंग, होल्डिंग आयलॅंड, सायकल डेपोच्या जवळच बस डेपो यांचा विचार करून त्यानुसार नियोजन केले जाणार आहे.

Web Title: thane news TMC