टीएमटीची धुरा जाणार नव्या सभापतीकडे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

ठाणे - गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पार पडलेल्या टीएमटीच्या समिती सदस्यांची निवडणूक झाल्यानंतर 16 जूनला परिवहन समितीचे सभापतिपद रिक्त होणार आहे. पुढील आठवड्यात परिवहनच्या सभापतिपदाची निवडणूक होणार आहे. परिवहन समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचा सभापती या पदावर बसणार आहे. या पदावर यंदा कोणाची वर्णी लागणार, याबद्दल उत्सुकता आहे. 

गेल्या वर्षी एप्रिल 2016 मध्ये परिवहन समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये शिवसेनेतून अनिल भोर, प्रकाश पायरे, राजू महाडिक, जेरी डेव्हिड, दशरथ यादव, संजय भोसले व साजन कासाय निवडून गेले आहेत. मनसेचे राजेश मोरे यांची वर्णी लागली होती; मात्र राजेश मोरे यांनी या पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे वाढलेली सदस्यसंख्या ही शिवसेनेसाठी जमेची बाजू ठरली आहे. राष्ट्रवादीकडून सुरेंद्र उपाध्याय, तकी चेऊलकर आणि हेमंत धनावडे आणि कॉंग्रेसकडून सचिन शिंदे हे निवडून गेले आहेत. परिवहनचे विद्यमान सभापती दशरथ यादव यांचा कार्यकाळ 16 जूनला संपुष्टात आल्याने आता पुन्हा पुढील आठवड्यात परिवहन समितीच्या सभापतीची निवडणूक होणार आहे. दशरथ यादव यांना यापूर्वीच शिवसेनेने संधी दिली असल्याने आता या पदासाठी राजू महाडिक, अनिल भोर, जेरी डेव्हिड आणि संजय भोसले यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या वर्षी चर्चेत नसतानाही दशरथ यादव यांना शिवसेनेकडून अचानक संधी देण्यात आली होती. त्यामुळे चर्चेतील नावांना की इतर कोणाला या पदावर बसण्याची संधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: thane news tmt

टॅग्स