टीएमटी सभापतिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

ठाणे - ठाणे महापालिकेच्या परिवहन समिती (टीएमटी) सभापतिपदावर वर्णी लागावी, यासाठी शिवसेनेतच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येत्या २९ जुलैला परिवहन सभापतिपदासाठी निवडणूक होत आहे. 

ठाणे - ठाणे महापालिकेच्या परिवहन समिती (टीएमटी) सभापतिपदावर वर्णी लागावी, यासाठी शिवसेनेतच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येत्या २९ जुलैला परिवहन सभापतिपदासाठी निवडणूक होत आहे. 

याबाबतची सभा सूचना पालिका सचिवांनी जारी केली असून, मंगळवारी (ता. २५) यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, १३ सदस्यीय समितीत शिवसेनेचे आठ सदस्य असल्याने ही निवड बिनविरोध होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. ठाणे महापालिका परिवहन समितीत शिवसेनेचे आठ सदस्य, तर राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेसचा एक आणि स्थायी समिती सभापती हे पदसिद्ध सदस्य असे एकूण १३ सदस्य आहेत. परिवहन समिती सभापती निवडण्याच्या प्रक्रियेत परिवहन सदस्य आणि स्थायी समिती सभापती यांना मतदानाचा अधिकार आहे. दरम्यान, शिवसेनेतील इच्छुकांनी सभापतिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. 

Web Title: thane news TMT