उल्हासनगर पालिकेत मॉकड्रिल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

उल्हासनगर - जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १३) आगीच्या मॉकड्रिलचा थरार अनुभवला. 

उल्हासनगर - जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १३) आगीच्या मॉकड्रिलचा थरार अनुभवला. 

सुरुवातीस पालिकेला आग लागल्याची माहिती पसरल्याने कर्मचाऱ्यांवर जीव मुठीत घेऊन पळ काढण्याची वेळ आली. आयुक्त राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. विजया कंठे, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे, सहायक आयुक्त गणेश शिंपी, अलका पवार, मनीष हिवरे यांच्यासह अग्निशमन दल; तसेच मुख्य सुरक्षा रक्षक बाळू नेटके आदींनी धाव घेत अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग प्रतिबंधक उपाययोजना राबवून आग आटोक्‍यात आणण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. पालिकेत आलेले नागरिकही काही क्षण घाबरले; मात्र हा मॉक ड्रिल असल्याचे समजताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.

Web Title: thane news ulhasnagar municipal corporation

टॅग्स