ठाणे: कळव्यात महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

कळवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या महिला कॉन्स्टेबलचा मोबाईल जप्त केला आहे. तिचे शव विच्छेदनासाठी कळव्यातील रुग्णालयात नेण्यात आले आहे. या संदर्भात कळवा पोलिस अधिक चौकशी करीत आहेत.

कळवा : कळवामधील मनीषा नगरमध्ये राहणाऱ्या एका 21 वर्षीय महिला पोलिस कॉन्स्टेबलनी बुधवार रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ठाणे पोलिस मुख्यालयात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कळवा मनीषा नगर परिसरात सारिका पवार (21) या कार्यरत आहेत. त्या अविवाहित आहेत. बुधवारी रात्री घरात कोणी नसताना साडेआठच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साहयाने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजले नसून कळवा पोलिसांना तेथे कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून का प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाली आहे? हे गूढ असून कळवा पोलिस या संदर्भात उशीरा पर्यंत चौकशी करीत होते.

कळवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या महिला कॉन्स्टेबलचा मोबाईल जप्त केला आहे. तिचे शव विच्छेदनासाठी कळव्यातील रुग्णालयात नेण्यात आले आहे. या संदर्भात कळवा पोलिस अधिक चौकशी करीत आहेत.

Web Title: Thane news women police constable commits suicide