ठाण्यात घातपातासाठी रेल्वेची मुक्त दारे!

Thane-Railway-Station
Thane-Railway-Station

ठाणे रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेला तीन मुख्य प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी एकाही प्रवेशद्वारात प्रवासी आणि त्यांच्या सामानांच्या तपासणीचे यंत्र नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ठाणे स्थानकात घातपात घडवू पाहणाऱ्याला रेल्वे प्रशासनाने आपली सर्व दारे खुली केल्याचे दिसत आहे.

२६/११ बॉम्बस्फोटाला आज १० वर्षे पूर्ण झाली. या दुर्दैवी घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग येईल आणि स्थानक परिसरातील स्थिती सुधारेल, असा विश्‍वास रेल्वे प्रवाशांना होता; मात्र रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारानंतर स्थानक परिसराच्या सुरक्षेत १० वर्षांमध्ये कसलीही वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्य म्हणजे ठाणे रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेला, फलाट क्रमांक दोनच्या प्रवेशद्वारावर प्रवाशांच्या तपासणीसाठी बसवण्यात आलेली मशीनच रेल्वे प्रशासनाने काढून पूर्वेकडे नेली. पश्‍चिमेला सुरक्षा नसण्यामागचे कारण रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, पूर्वेकडून स्थानक परिसरात लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणारे प्रवासी सर्वाधिक ये-जा करतात. त्यामुळे आम्ही तिथे तपासणी यंत्रणा पुरवण्यात आल्याचा दावा त्यांच्याकडून केला आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेसुरक्षा दलातील (आरपीएफ) एकही कर्मचारी फलाट किंवा पुलावर दिसून येत नाही. या ढिसाळ कारभारामुळे स्थानक परिसरात येण्यासाठी अनेक चोरमार्गही निर्माण झाले आहेत. मात्र, या अजब दाव्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

 ठाणे रेल्वेस्थानकातून दिवसाला पाच लाख प्रवासी ये-जा करत असतात. 
 सुमारे तीन लाखांहून अधिक प्रवासी हे पश्‍चिमेकडून ये-जा करतात. 
 स्थानकाच्या पश्‍चिमेला एकूण तीन प्रवेश मार्ग आहेत. याशिवाय रेल्वे रूळांनजीक अनेक चोर मार्ग आहेत. या सर्व मार्गांतून कोणीही सर्रास रेल्वेस्थानकात प्रवेश करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com