esakal | स्वच्छ सर्वेक्षणात ठाण्याची गरूड झेप! राज्यात तिसरे तर देशात.... 
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे महापालिका.jpg

ठाणे शहराला स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळत असताना स्वच्छतेमध्ये मात्र शहर कायम मागे पडत होते. त्यावरून अनेक वेळा टिकाटिप्पणीही करण्यात येत होती; मात्र यंदाच्या केंद्र सरकाच्या स्वच्छता सर्व्हेक्षणात देश पातळीवर ठाणे शहराने तब्बल 57 व्या क्रमाकांवरून 14 व्या क्रमाकांवर झेप घेतली आहे; तर राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात ठाण्याची गरूड झेप! राज्यात तिसरे तर देशात.... 

sakal_logo
By
राजेश मोरे

ठाणे ः ठाणे शहराला स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळत असताना स्वच्छतेमध्ये मात्र शहर कायम मागे पडत होते. त्यावरून अनेक वेळा टिकाटिप्पणीही करण्यात येत होती; मात्र यंदाच्या केंद्र सरकाच्या स्वच्छता सर्व्हेक्षणात देश पातळीवर ठाणे शहराने तब्बल 57 व्या क्रमाकांवरून 14 व्या क्रमाकांवर झेप घेतली आहे; तर राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. 
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाच्या वतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. सन 2020 रोजी कचऱ्याचे संकलन व त्याची वाहतूक, प्रक्रिया, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृद्धी या निकषांवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात आले होते. या सर्वेक्षणात या वर्षी ठाणे शहरात गतवर्षीच्या 57 व्या क्रमांकावरून देशात 14 व्या क्रमांकावर आघाडी घेतली आहे; तर राज्यात ठाणे शहराने तिसरा क्रमांक पटकवला आहे. या यशाबद्दल महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. 

महत्त्वाची बातमी - ठाण्याचे आयुक्त ऑनफिल्ड! एका दिवसात 850 खड्डे बुजवले; बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनाही सुनावले


मागील वर्षी ठाणे शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत 57 व्या क्रमांकावर होते; तर त्याच्या आदल्या वर्षी 40 व्या क्रमांकावर होते. त्यामुळे पालिकेवर जोरदार टीकाही झाली होती. एका वर्षात पालिकेचा क्रमांक घसरल्याने पालिकेवर टीका केली गेली होती. त्यानंतर मात्र यंदा पालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत केलेल्या विविध स्वरूपाच्या उपाययोजनांमुळे पालिकेने यात सुधारणा केल्याचे दिसून आले आहे. 
कोणत्याही शहराचे आरोग्य हे तेथील कचरा व्यवस्थापनावरून ठरत असते. कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली न गेल्यास त्याचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन होण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारकडून सातत्याने पाठपुरावा होत असतो, पण अनेक कारणांमुळे ठाणे महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाबाबत आक्षेप घेतले जात होते. त्यामुळेच कायम बकाल शहर असे चित्र शहराचे उभे राहत होते, पण नव्या सर्व्हेनुसार शहराच्या कचरा विषयक दृष्टिकोनात आता बदल झाल्याचे दिसते आहे. 

महत्त्वाची बातमी - मुंबईत क्वारंटाईन होण्यापासून वाचण्यासाठी दिल्लीतील CBI पथक उचलणार अशी पावलं


स्वच्छता प्रकल्पांवर भर 
महापालिकेच्या माध्यमातून मागील काही वर्षात स्वच्छतेबाबत विविध स्वरूपाचे उपाय योजले आहेत. त्यानुसार कचऱ्याचे वर्गीकरण, घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, विविध स्वरूपाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, त्याचे प्रकल्प उभारणे आदी बाबींवर भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे शहराने यंदा स्वच्छ सर्वेक्षणात बाजी मारल्याचे दिसून आले आहे. 

(संपादन ः रोशन मोरे)
Thane ranks 14th in the country in the Government of India's Clean Survey
 

loading image
go to top