esakal | ठाणे : भाविकांचे सोशल डिस्टन्सिंग
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाणे : भाविकांचे सोशल डिस्टन्सिंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कोरोनाचा (Corona) संसर्ग आटोक्यात येत असल्याने राज्य सरकारच्या परवानगीनुसार आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरांची (Temple) द्वारे भाविकांसाठी खुली करण्यात आली. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंदिरांची द्वारे उघडल्याने पहिल्याच दिवशी भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करून दर्शन घेतले.

या वेळी भाविकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि समाधान झळकत होते. नवरात्रोत्सवापासून मंदिर उघडणार असल्याने मंदिरांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस प्रशासनासह मंदिर व्यवस्थापनाकडूनही विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. ठाण्यातील कोपिनेश्वर, घंटाळीदेवी, गावदेवी, तुळजाभवानी, प्रतिशिर्डी समजले जाणारे वर्तकनगर येथील साई बाबा मंदिर आदी ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना सुरक्षेच्या कारणास्थव गाभाऱ्याबाहेरूनच देवीचे दर्शन घेण्याची परवानगी होती. तसेच देवतांसाठी आणलेल्या ओट्या, हार-तुरे, अभिषेक अर्पण करण्यासाठी परवानगी नव्हती. मंदिरातील पुजाऱ्यांकडूनच हे सर्व धार्मिक विधी केले जात होते. दर्शन रगित बॅरिकेट्स बसवणे, निर्जंतुकीकरण आदी उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा: यंदाही कावड यात्रा नाही; भाविकांच्या मागणीला प्रतिसाद नाही

मंदिर उघडणार असल्याने पहिल्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होईल असा अंदाज होता; मात्र भाविकांनी सामाजिक भान राखत मंदिरांमध्ये जाण्याचे टाळले; तर काहींनी मंदिराबाहेरूनच मूर्तीचे दर्शन घेतले. त्यामुळे कोपिनेश्वरसारख्या प्रसिद्ध मंदिरातही भाविकांची तुरळक गर्दी होती. तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांनीही मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाची सुरुवात होत असल्याने ठाण्यातील प्रसिद्ध देवींच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी नियंत्रणासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. देवीच्या दर्शनासाठी रांगेतील भाविकांना टप्प्याटप्प्याने मंदिरात प्रवेश दिला जात होता.

loading image
go to top