ठाणे स्थानकात नवी इमारत हवी 

ठाणे स्थानकात नवी इमारत हवी 

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाची धोकादायक झालेली इमारत पाडून प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेली इमारत उभी करावी, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी संसदेत शून्य प्रहरादरम्यान केली.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीला ५० वर्षे झाली असून ती धोकादायक ठरत असल्याची बाब खासदार राजन विचारे यांनी यापूर्वीच रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. यासंदर्भात सभागृहात चर्चा करण्यात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या इमारतीची तात्पुरती डागडुजीही केली होती.

या इमारतीचे जुने प्रवेशद्वारही बंद करण्यात आले आहे. परिणामी, सकाळी व संध्याकाळी प्रवाशांना स्थानकातून बाहेर निघताना अडथळा होतो. त्यात फेरीवाल्यांच्या त्रासाला प्रवाशांना सामोरे जावे लागते, हेही विचारे यांनी निदर्शनास आणून दिले. या धोकादायक इमारतीमुळे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या सात ते आठ लाख प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे असेही ते म्हणाले. रेल्वे प्रशासनाने मोठी दुर्घटना टाळण्यासाठी इमारतीतील कार्यालय स्थलांतरित करून, इमारत पाडून नवीन सोयी-सुविधांयुक्त असलेल्या इमारतीची उभारणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 

web title : Thane station needs a new building

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com