ठाणे, उल्हासनगरसाठीही "पॅकेज' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई - युतीच्या चर्चेचे धनुष्य पुरेसे ताणल्यावर शिवसेनेकडून आश्‍वासनांचे बाण सुटू लागले आहेत. मुंबईपाठपोठ ठाणे आणि उल्हासनगरसाठीही रविवारी शिवसेनेने करसवलतीचे "पॅकेज' जाहीर केले आहे. सामान्यांना मालमत्ता करात सूट देण्यासह भाजपचे पारंपरिक मतदार असलेल्या व्यापारी आणि दुकानदारांचीही स्वच्छता करातून सुटका करण्यासह ठाण्यासाठी स्वतंत्र धरण बांधण्याचे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. 

युतीची चर्चा ताणल्यावर शिवसेनेकडून महापालिका निवडणुकांसाठी घोषणांचा पाऊस सुरू होतो. निवडणुकीत युती न झाल्यास वचननाम्यात भाजपपुढे कमी पडू नये, यासाठी शिवसेनेने आतापासूनच मैदान तयार केले आहे. यापूर्वी शिवसेनेचा संपूर्ण वचननामा एकावेळीच जाहीर होत असे; मात्र यंदा टप्प्याटप्प्याने हा वचननामा जाहीर करून भाजपची अडचण वाढवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असल्याचे दिसते. मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिकांमध्ये शिवसेनेची लढत भाजपशी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच जाहीरनामा टप्प्याटप्प्याने मांडण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. पत्रकार परिषदेत उद्धव यांनी ठाणे आणि उल्हासनगर शहरातील नागरिकांकरिता आश्‍वासनांचा पाऊसच पाडला. 

शिवसेना आश्‍वासन पूर्ण करते 
मालमत्ता करात सूट देण्याची मागणी भाजपची असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, उद्धव म्हणाले, की त्यांची मागणी असेल, तर माझे अज्ञान आहे. त्याबद्दल मला तुम्ही क्षमा करा; पण मी आतापर्यंत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली आहे. आश्‍वासने देणे आणि ती पूर्ण करणे यात फरक असतो, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.

Web Title: Thane, Ulhasnagar for package