चार बटणांमुळे ठाणेकर संभ्रमात

- शाम देऊलकर
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - मतदान करण्यासाठी आलेले ठाणेकर मतदानासाठी दाबाव्या लागणाऱ्या चार बटणांमुळे आज चांगलेच बुचकळ्यात पडले. चारही बटणे दाबल्याशिवाय मतदान यंत्राचा "बीप' असा आवाज येत नसल्याने मतदान झाल्याचेच समजत नव्हते. त्यामुळे हा मतदारांचा संभ्रम दूर करण्यासाठी उपस्थित शासकीय कर्मचाऱ्यांना कष्ट पडत होते.

गुंडांचा पक्षप्रवेश, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आदींमुळे ठाणे महापालिकेची यंदाची निवडणूक चांगलीच रंगली. मतदानाच्या दिवशी आज ठाणेकर सकाळपासून मतदानासाठी उत्साहात बाहेर पडले; परंतु प्रभाग मतदान पद्धतीमुळे अनेकांचा मोठा गोंधळ उडत होता. मतदाराला प्रत्येकी चार मते द्यायची होती. याविषयी निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाण्यात काही प्रमाणात प्रबोधनही केले होते; परंतु काही मतदार या पद्धतीबाबत अनभिज्ञ असल्याने मतदान करताना मोठ्या प्रमाणात गोंधळ उडत होता. निवडणूक विभागाने हा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली होती. चारही उमेदवारांना मतदान केल्यावरच "बीप'चा आवाज येत होता. हे अनेक मतदारांना कळत नव्हते. त्यामुळे त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवावे लागत होते.

प्रभाग मतदान पद्धतीची कल्पना होती; परंतु प्रत्यक्षात एका वेळी चार मते देणे हे काहीसे वेगळे असल्याने थोडे संभ्रमात टाकणारे होते. चार मते दिल्यावरच "बीप' आवाज होत असल्याने थोडा गोंधळ उडत होता.
- रितेश डोंगरे, मतदार

Web Title: thanekar confuse by four voting button