राज्यस्तरीय बॉक्‍सिंग स्पर्धेत ठाणेकर चमकले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्‍सिंग स्पर्धेत ठाणे बॉक्‍सिंग अकॅडमीच्या दीक्षा इंगळेने रौप्य तर खुशी यादवने कांस्य पदकाची कमाई केली. दीक्षाने 19 वर्षाखालील मुलींच्या 51 किलो वजनी गटात तर खुशीने 17 वर्षाखालील मुलींच्या 55 किलो वजनी गटाच्या लढतीत हे यश संपादन केले आहे. मुंबई विभागीय शालेय स्तरावर चमकदार कामगिरी केल्यानंतर आता दीक्षा व खुशीने राज्यस्तरावरही चांगली कामगिरी केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

ठाणे : औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्‍सिंग स्पर्धेत ठाणे बॉक्‍सिंग अकॅडमीच्या दीक्षा इंगळेने रौप्य तर खुशी यादवने कांस्य पदकाची कमाई केली. दीक्षाने 19 वर्षाखालील मुलींच्या 51 किलो वजनी गटात तर खुशीने 17 वर्षाखालील मुलींच्या 55 किलो वजनी गटाच्या लढतीत हे यश संपादन केले आहे. मुंबई विभागीय शालेय स्तरावर चमकदार कामगिरी केल्यानंतर आता दीक्षा व खुशीने राज्यस्तरावरही चांगली कामगिरी केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

औरंगाबाद येथे 3 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. राज्यस्तरीय स्पर्धेच्या 17 वर्षाखालील मुलींच्या 55 किलो वजनी गटाच्या उपउपांत्य फेरीच्या लढतीत खुशीचा सामना लातूर विभागाच्या गौरी सोनीशी झाली. खुशीने गौरीला पहिल्या फेरिपासूनच जेरीस आणले होते. वेगवान चाल करीत तीने गौरीला बचावाची एकही संधी न देता लढत जिंकली. खुशीचा उपांत्य सामना औरंगाबादच्या सुदीप्ती गायकवाड हिच्योसोबत झाला.

सुदीप्ती ही डावखुऱ्या शैलीने खेळणारी व खुशीपेक्षा उंचीने जास्त असल्याने तिच्यापुढे खुशीचा निभाव लागला नाही. खुशीने आपले सर्व डावपेच आजमावून पाहिले पण ती सुदीप्तीला नमवू शकली नाही आणि तिला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले. 

19 वर्षाखालील वयोगटात 51 किलो वजनी गटात ठाण्याच्या दीक्षा इंगळेची औरंगाबादच्या सिद्धी संत्रे हिच्याशी उपउपांत्य फेरीची लढत झाली. दोन्ही बॉक्‍सर तुल्यबळ असल्याने हा सामना चुरशीचा झाला. अखेर दीक्षाने सामना जिंकला. उपांत्य फेरीच्या लढतीत पहिल्या लढतीचा निसटत्या विजयाच्या पार्श्वभूमीवर दीक्षा अधिकच आक्रमक होत कोल्हापूर विभागाच्या गीता बासगीशी लढली.

गीताने तिला कडवी झुंज दिली. परंतु 5 ः 0 अशा गुणांवर दीक्षाने अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात दीक्षाची लढत नाशिक विभागाची राष्ट्रीय पदक विजेती बॉक्‍सर प्राजक्ता शिंदे हिच्याशी झाली. प्राजक्ताने आक्रमक खेळी करत दीक्षाला संधीच दिली नाही, अखेर दीक्षाचा अंतिम सामन्यात पराभव होऊन तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्य आणि रौप्य पदकांची कमाई केल्याबद्दल ठाणे शहर बॉक्‍सिंग संघटनेचे अध्यक्ष नरेश म्हस्के व ठाणे महापालिका क्रीडाधिकारी मीनल पालांडे यांनी त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thanekar shines in state-level boxing competition