esakal | ठाणेकरांचा जीव भांड्यात ; नऊ दिवसांत कोरोनाने एकही मृत्यू नाही
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

ठाणेकरांचा जीव भांड्यात ;नऊ दिवसांत कोरोनाने एकही मृत्यू नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : गणेशोत्सवानंतर कोरोना (Corona) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मात्र मृत्यूचे थैमान चांबले असल्याचे निदर्शनास आले आहे. सप्टेंबरमध्ये संपूर्ण ठाण्यात (Thane) अवघ्या ८ कोरोना (Corona) मृत्यूची (Death) नोंद झाली; तर या महिन्यातील 60000 नऊ दिवसांमध्ये निरंक म्हणजे शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. दोड, दोन वर्षांपासून दोन हजार ९९ जणांना कोविडमुळे जीव गमवावा लागला असल्याने कोरोनाशी झुंज देत असलेल्या ठाणेकरांचा जीव खऱ्या अर्थाने भांड्यात पडला असल्याचे म्हणावयास हरकत नाही.

दुसरी लाट सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्यात कोरोनाने ३४६ ठाणेकरांचा बळी घेतला होता. त्या वेळी दररोज कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल २३२७ पर्यंत झेपावली होती. त्यानंतर मे महिन्यात ही रुग्णसंख्या ६३९ पर्यंत कमी झाली असली तरी १९० रुग्णांनी प्राण गमावले होते. त्यानंतर जून महिन्यापासून कोरोना नियंत्रणात आला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या तळाला गेल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. जून महिन्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर एक ते दीड महिन्यात तिसरी लाट धडकेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. गणेशोत्सवापासून रुग्णसंख्या वाढत आहे; मात्र तरीही सुदैवाने तिसऱ्या लाटेची कोणतीही लक्षणे अद्याप दिसत नाहीत.

हेही वाचा: कोरोना झाल्यावर लोक मरणावर उठले; चक्रवर्तीनं शेअर केला भयावह अनुभव

गेल्या महिन्यापर्यंत कोरोना संक्रमणाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिलासादायक माहिती हाती आली आहे. आजवरचे कोरोनाचे सर्वांत कमी संक्रमण ऑगस्ट २०२१ मध्ये नोंदवले गेले आहे. या महिन्यात दररोज सरासरी ४९ प्रमाणे १,५२९ जणांनाच कोरोनाची लागण होत होती.

ऑगस्ट महिन्यात या आजाराने १२ जणांचा बळी घेतला होता. तो आकडा सप्टेंबरमध्ये घटून ८ पर्यंत ८ कमी होऊन मृत्यू संख्येने एकआकडी संख्या गाठली होती.

loading image
go to top