esakal | खड्ड्यातून होणार विघ्नहर्त्याचे आगमन
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

खड्ड्यातून होणार विघ्नहर्त्याचे आगमन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दरवर्षीप्रमाणे मुंबईत (Mumbai) यंदाही विघ्नहर्त्याचे खड्ड्यांतूनच आगमन होणार आहे. रस्त्यांवर ठिकाठिकाणी खड्डे पडलेले असताना महापालिकेच्या (Municipal) हिशेबात फक्त ३१६ खड्डे शिल्लक आहेत. तरीही पालिकेने ९ एप्रिल (April) ते ८ सप्टेंबरपर्यंत (September) ३१ हजार ३९८ खड्डे दुरुस्त केल्याचा दावा केला आहे.

पालिकेच्या नोंदीनुसार मुंबईत पावसाळ्यात ९०५ खड्ड्यांची नोंद झाली आहे. त्यातील ५८९ खड्डे आतापर्यंत दुरुस्त करण्यात आले आहेत. तर, उर्वरीत खड्डे दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार नेमकेच खड्डे दिसत आहे. प्रत्यक्षात मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात खड्ड्यांचा मुद्दा पुढे येतो. त्यावेळी सार्वजनिक मंडळाच्या मार्गातील खड्ड्यांची दुरुस्ती वेगाने केली जाते. मात्र, मुंबईत लाखांच्या वर घरगुती गणपतीचे आगमन होते. तरीही लहान मोठ्या गल्ल्यांमधील खड्डे दुरुस्ती अपेक्षेप्रमाणे होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात

हेही वाचा: नाशिक महापालिकेने 348 गणेश मंडळांना परवानगी नाकारली

महापालिकेने २४ विभागात खड्डे दुरुस्तीसाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक प्रभागात ५० लाखांचा खर्च अपेक्षित करून १२ कोटी रुपयांची तरतूद खड्डे दुरुस्तीसाठी करण्यात आली आहे. खड्डे दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी युद्ध पातळीवर केले जाते. त्यानंतर पावसाळ्यातही हे काम सुरू असते. पालिकेने ९ एप्रिल ते ८ सप्टेंबरपर्यंत ३१ हजार ३९८ खड्डे दुरुस्त केल्याचा दावा केला आहे.

प्रतिबंधात्मक उपायांसाठी दीड कोडी

महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांविषयीच्या कामासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाला दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेने यावेळी कोल्ड मिक्स या डांबर आणि खडीच्या मिश्रणाने खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेच्या वरळी येथील अस्फाल्ट प्लांटमध्ये तब्बल अडीज हजार टन मिश्रण तयार करण्यात आले. पावसातही खड्डे दुरुस्ती करता येते, असा दावा प्रशासन करत आहे. मात्र, कोल्डमिक्स दर्जावर शिवसेनेही आक्षेप घेतला आहे.

खड्ड्यांचा हिशोब

पालिकेच्या कामगारांनी भरलेले - २२ हजार ८९७

कंत्राटदारांनी भरलेले - ८ हजार ५०१

दुरुस्त केलेल्या खड्ड्यांचे क्षेत्रफळ - १ लाख ६ हजार ९८५

loading image
go to top