esakal | गटारावरील झाकणे तुटली ! वसई-विरारमध्ये नागरिकांना अपघाताची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

गटारावरील झाकणे तुटली ! वसई-विरारमध्ये नागरिकांना अपघाताची भीती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विरार : वसई-विरार (Vasai-Virar) शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गटावरील झाकणे तुटली आहेत; तर काही ठिकाणावरील झाकणेच गायब आहेत. त्यामुळे रात्री अंधारात येथे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गटारावरील झाकणे बसवण्यासाठी ठेकेदाराला ऑर्डर देण्यात आली आहे; मात्र ठेकेदाराकडून अजूनही झाकणे मिळाली नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे तर कार्यादेश मिळाला नसल्याने झाकणे दिली नसल्याचे ठेकदार सांगत आहेत.

शहरातील उघड्या गटारांचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. पावसाळ्यात अनेक दुर्घटना होऊनही अजूनही शहरातील विविध ठिकाणी उघडी गटारे तशीच आहेत. मागील तीन महिन्यांपासून पालिकेतील गटाराची झाकणे संपली आहेत. ठेकेदाराला मागणी देऊनहीं ठेकेदाराकडून हा पुरवठा होत नसल्याने पालिका अधिकारी सांगत वेळ मारून नेत आहेत. मुळात एप्रिल किंवा मेमध्ये प्रभाग समिती अंतर्गत सर्व्हे करून किती झाकणे पाहिजेत, याचा कार्यादेश ठेकेदाराला द्यायला हवा असताना तो दिला गेला नाही; तर ठेकेदार काम कसे करणार, असा प्रतिप्रश्न माजी नगरसेवक उपस्थित करून पालिका प्रशासन कामचुकारपणा करत असल्याचा आरोप करत आहेत.

हेही वाचा: आमच्याकडे कुणी लक्ष देणार काय?

आमच्याकडे गटाराची झाकणे तुटली आहेत किंवा ती गायब झाल्याच्या तक्रारी माजी नगरसेवक, सामान्य नागरिक करत आहेत. त्याबाबत सर्व्हे केला असून ठेकेदाराला ऑर्डरही दिली आहे. लवकरच त्या ठिकाणी नवीन झाकणे लावली जातील.

- महादेव गिरगावकर, कार्यकारी अभियंता, वसई विरार पालिका

loading image
go to top