

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर ज्या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील राजकीय लढतींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते म्हणजे शिवसेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन पक्षांत. दोन्ही पक्षांनी त्यांचे सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यभरात तब्बल ४७ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे व ठाकरे यांच्या शिवसेनेत सरळ लढत होणार आहे.