esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

‘मार्ड’चा संप चार दिवसांनंतर मागे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रलंबित मागण्यांसाठी चार दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मार्ड डॉक्टरांनी अखेर संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्ड डॉक्टर आणि इतर अधिकाऱ्यांसह आज (ता. ४) बैठक घेतली. यावेळी महिन्याभरात मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना दिले. त्यानंतर केंद्रीय मार्ड संघटनेने मुंबईसह राज्यातील सर्व डॉक्टरांना उद्यापासून पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले.

उद्यापासून (ता. ५) सर्व रुग्णालयांमध्ये ओपीडी सेवा सुरू होईल. मार्डचे निवासी डॉक्टर शुक्रवारपासून सामूहिक रजेवर गेले होते. शैक्षणिक शुल्क माफ करणे, वसतिगृहात सुधारणा आदी मागण्या त्यांनी केल्या होत्या.

प्रशासनाकडून शैक्षणिक शुल्क माफ करणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शैक्षणिक शुल्काच्या बदल्यात डॉक्टरांना सन्मान निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला.

- डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे,

केंद्रीय मार्डचे अध्यक्ष.

loading image
go to top