esakal | मुंबई : उद्या लसीकरण बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबईत उद्या लसीकरण बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील (Mumbai) शासकीय व महानगरपालिका (Municipal) केंद्रांवर उद्या शुक्रवार 15 ऑक्टोबर 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे. तर, शनिवारी 16 ऑक्टोबर 2021 रोजी लसीकरण पूर्ववत सुरु ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरीही लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

हेही वाचा: जिल्ह्यात ३४० गावांत आता जनावरांचे लसीकरण

मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.  दरम्यान, आतापर्यंत मुंबईत 95 लाखांहून अधिक नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. तर, 50 टक्क्यांहून अधिक नागरिक कोविडमधून सुरक्षित झाले आहे.

loading image
go to top