esakal | विद्युत सहायकांची निवड यादी अखेर जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

विद्युत सहायकांची निवड यादी अखेर जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहायक पदांचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या आर्थिक दुर्बल घटक वगळता इतर सर्व प्रवर्गातील ४ हजार ५३४ उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ट्विटद्वारे अभिनंदन केले. महावितरण कंपनीतील विद्युत सहायक पदांच्या एकूण पाच हजार पदांसाठी ९ जुलै २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात वेगवेगळ्या प्रवर्गासोबत आर्थिक दुर्बल घटकाला आरक्षण दिले होते. सध्या अर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ४६६ जागा वगळता उर्वरित ४ हजार ५३४ जागांचा निकाल महावितरणने जाहीर केला आहे. यानुसार खुल्या प्रवर्गातून १९८४ पदांचा तर अनुसूचित जातीसाठी ३७५, अनुसूचित जमातीसाठी २३६, विमुक्त जातीसाठी १०९, भटक्या जमाती (व) साठी ८०, भटक्या जमाती (क)साठी ११८, भटक्या जमाती (ड)साठी ४४, विशेष मागास प्रवर्गासाठी १८१ व इतर मागास वर्गासाठी १५०७ पदांचा निकाल जाहीर केला आहे.

हेही वाचा: तलाठी भरती प्रक्रियेवर मराठा समाज नाराज

न्यायालयाने भरती प्रक्रियेवर लावलेली स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकार व महावितरणकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी महावितरणची बाजू सक्षमपणे मांडण्याकरिता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ नियुक्त केले आहेत. कोरोना आणि न्यायालयीन प्रकरणे यामुळे विद्युत सहायक पदासाठी नियुक्ती प्रक्रिया रखडली होती. ही प्रक्रिया सुरू असताना ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणाला स्थगिती दिली.

loading image
go to top