फ्लॅटधारकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चौकडीचा पर्दाफाश

दिनेश गोगी
सोमवार, 9 जुलै 2018

उल्हासनगर : फ्लॅटधारक कामावर जाताच त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा शिताफीने उघडून त्यातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चौकडीचा उल्हासनगरगुन्हेअन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दुकलीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांनी 24 घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 14 लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीं जुल्फिकार उर्फ राजू हसमत अली इद्रिसी ( 23 ), ब्रिजेशकुमार जगतपाल गुप्ता ( 23 ) दोघेही राहणार संजय गांधीनगर पाठणवाडी मालाड मुंबई येथील असून ते मूळचे उत्तर प्रदेश येथील हिरागंज जिल्हा प्रतापगड येथील राहणार आहेत. हे दोघे आणि त्यांच्या सोबत असलेले आणखीन दोन जण अशी चौकटी उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या शहरात इमारतीत राहणारे कोणकोण कामाला जातात याची माहिती गोळा करत असत. यासाठी ते सेन्ड्रो झिंग या कारचा वापर करीत असत. फ्लॅटधारक कामाला जाताच शिताफीने फ्लॅट उघडून आतील कपाटात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारून दुसरे सावज शोधत असत.

24 फ्लॅटधारकांनी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून त्यातील दागिने चोरी गेल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात केल्या होत्या. त्यानुसार इमारती मधील सीसीटीव्ही पुटेज बघण्यात आले आणि त्याआधारे जुल्फिकार उर्फ राजू हसमत अली व ब्रिजेशकुमार गुप्ता यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.  त्यांनी 24 गुन्ह्याची कबुली दिली आहे. 14 लाखाचे दागिने देखील हस्तगत करण्यात ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पाटील ,युवराज सालगुडे,, श्रीकृष्ण नावले, गणेश तोरगल, सुरेंद्र पवार, रामसिंग चव्हाण, किशोर महाशब्दे , संजय कोळी, नवले , सुनील जाधव  यांच्या पथकाने या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला .

Web Title: theft arrested by