चोराकडे सापडले 217 मोबाईल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

मोबाईल चोरीला गेल्याच्या एका तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे घोष याला अटक केली आणि चोरीचा मोबाईल हस्तगत केला. रेल्वे पोलिसांनी कसून चौकशी केली असता तो चोरीचे मोबाईल खरेदी करणे आणि चोरीही करणे अशी कामे करत असल्याचे उघड झाले.

मुंबई - रेल्वे पोलिसांनी जीत घोष (वय 40) याला अटक करून त्याच्याकडून चोरीचे 217 मोबाईल जप्त केले. या मोबाईलची किंमत 11 लाख 47 हजार 500 रुपये आहे.

मोबाईल चोरीला गेल्याच्या एका तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे घोष याला अटक केली आणि चोरीचा मोबाईल हस्तगत केला. रेल्वे पोलिसांनी कसून चौकशी केली असता तो चोरीचे मोबाईल खरेदी करणे आणि चोरीही करणे अशी कामे करत असल्याचे उघड झाले. त्यानुसार, पोलिस पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असता 217 महागडे मोबाईल सापडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft Mobile Crime