कोरोनामुळे चोरांची तंतरली, वाचा कोरोनाला 'कसे' घाबरलेत चोरटे...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

मुंबई-  कोरोना विषाणूचा सध्या सर्वांनीच धसका घेतला असून यामध्ये गुन्हेगारांचाही समावेश आहे. त्यात सर्वाधिक धसका रेल्वे चोरट्यांनी घेतल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ दिवसांत लांब पल्ल्याच्या एक्‍स्प्रेस तसेच उपनगरी गाड्यांमधील गुन्हे 30 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. 

मुंबई-  कोरोना विषाणूचा सध्या सर्वांनीच धसका घेतला असून यामध्ये गुन्हेगारांचाही समावेश आहे. त्यात सर्वाधिक धसका रेल्वे चोरट्यांनी घेतल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ दिवसांत लांब पल्ल्याच्या एक्‍स्प्रेस तसेच उपनगरी गाड्यांमधील गुन्हे 30 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. 

कोरोनामुळे चोरट्यांनी चोरी करण्याऐवजी घरात राहणे पसंद केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूमुळे संशयित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, घरातून मास्क लावूनच बाहेर पडावे, जास्तीत जास्त स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

#COVID19 - कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

मध्य, हार्बर आणि पश्‍चिम रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या वेळी गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे पैशांचे पाकीट, लॅपटॉप, मोबाईल आणि कॅश चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या रेल्वेत सक्रिय आहेत. अशा काही गुन्हेगारांवर पोलिस कारवाई करीत असले, तरी त्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही.

दररोज रेल्वेच्या विविध पोलिस ठाण्यांत चोरी, जबरी चोरी, मोबाईल, बॅग, पर्स, पाकीट आणि लॅपटॉप चोरीसह रोख रक्कम चोरीच्या शंभरच्या आसपास अधिक गुन्ह्यांची नोंद होत होती. त्यात मोबाईल चोरीच्या 70 हून अधिक गुन्ह्यांची नोंद होते; मात्र या गुन्ह्यांत गेल्या काही दिवसांत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. कोरोनामुळे एकीकडे प्रवाशांची गर्दी कमी झाली असून दुसरीकडे चोरट्यांनीही कोरोनाची धास्ती घेतल्याने चोरीचे प्रमाण सध्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांत दाखल झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण 30 टक्‍क्‍यांनी कमी झाले असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. 

theft rate in trains dropped due to corona panic read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft rate in trains dropped due to corona panic read full story