देवी-देवतांच्या मूर्तीवर चोरट्यांचा डल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

विरार ः नालासोपारा येथील श्री प्रस्थ वसाहतीतील तिसऱ्या रस्त्यावरील बिल्डिंग नंबर 64 जवळ असणाऱ्या छोट्या साई मंदिरात चोरी करत चोरट्यांनी मंदिरातील 15 छोट्या-मोठ्या आणि विविध धातूच्या मूर्ती पळवल्या; मात्र येथील नागरिक आणि समाजसेववकांच्या सतर्कतेमुळे आणि धावपळीमुळे अखेर चोर सापडले. त्यामुळे चोरांसोबत काही मूर्तीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. 

प्रणव आनंद चौहाण, करण किसनलाल कपूर, शमीम नसीम खान अशी या मूर्तिचोरांची नावे असून ते नालासोपाऱ्यातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत लब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. 

नालासोपाऱ्यात 25 जुलैला पहाटे पाच ते दुपारी 12 दरम्यान चोरीची घटना घडली. दरम्यान फिर्याद दाखल करणारे करण एस. डेव्हिड, नगरसेविका शुभांगी गायकवाड, कार्यकर्ते नवीन वाघचौडे, कामेश गमरे, सागर वाघ, ओंकार भोत, प्रथमेश काळे, जेम्स रोझोरियो, प्रसाद चौलंगी, नगिंदर सिंग यांनी चोरीनंतर चोरांचा शोध घेतला आणि लपून बसलेल्या तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. . 

भाडेकरूंची संख्या अधिक 
श्री प्रस्थ वसाहतीत भाडेकरूंची संख्या अधिक आहे आणि कोण कोणाकडे राहतो आणि निघून जातो हे कळत नाही. येथे बेरोजगार युवक आणि नशेबाज तरुणांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी तर चौथ्या रोडवर राहणाऱ्या प्रीती मिश्रा या महिलेवर चोरीच्या हेतूने प्राणघातक हल्ला झाला होता. तेव्हासुद्धा तिथेच राहणारे पत्रकार रमाकांत वाघचौडे व शेजारच्या काही रहिवाशांनी धाडस करून हल्लेखोरास पकडून दिले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft at Sai Temple in Nalasopara near Mumbai