शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते चौगुलेंच्या घरी नोकरानेच मारला डल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

नवी मुंबई : महापालिकेचे शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांच्या ऐरोलीतील यश पॅराडाईज घरी शुक्रवारी रात्री कपाटातील 112 तोळे सोने व अडीच लाख रुपयांची रोख रकमेवर त्यांच्याच नोकरानेच डल्ला मारल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राबळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अनुराग सिंग असे नोकराचे नाव असून तो चौगुलेंच्या घरी मागील पाच ते सहा वर्षांपासून घरकाम करीत होता. वयाने लहान असल्यामुळे अल्पावधीतच त्याने चौगुले कुटुंबीयांचा विश्वास मिळवला होता. त्यामुळे तो घरी एकटा असला तरी कधी संशय निर्माण होत नव्हता. काही दिवसांपासून अनुरागने आपण गावी जाणार असल्याचे तगादा लावला होता. त्यानुसार त्याला गावी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र शुक्रवारच्या रात्री घरी कोण नसल्याचा फायदा घेत अनुरागने कपाटातील अडीच लाख रुपयांची रोख रक्कम व एकूण 112 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.

काही उशिराने चौगुले कुटुंबियातील सदस्य घरी आल्यावर उघड्या कपाटातील सोने व रोख रक्कम गायब झाल्याचे पहिल्यावर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. मात्र यावेळी घरात अनुराग ही गायब असून त्याचा फोन बंद असल्यामुळे पोलिसांकडून अनुरागवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी राबळे पोलिसांनी अनुरागच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तैनात करून तपास सुरू केला आहे.

Web Title: theft at Shiv Sena leader Vijay Chaugules house in Navi Mumbai