थीमपार्कचे शिवसेनेचे स्वप्न बारगळले? 

थीमपार्कचे शिवसेनेचे स्वप्न बारगळले? 

मुंबई - महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीमपार्क उभारण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारने लाल कंदील दाखवल्याने तो बारगळल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांच्या पालिकेच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पातून थीमपार्कला वगळण्यात आले आहे. 

रेसकॉर्सवर थीपमार्क तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्याचे शिवसेनेचे स्वप्न होते. त्यासाठी रेसकोर्सची जमीन मिळवण्यासाठी शिवसेनेने आटापिटा केला होता. दोन वर्षे अर्थसंकल्पात थिमपार्कचा अंतर्भाव करत त्यासाठी तरतूदही केली होती. या प्रकल्पाला पालिकेच्या गटनेत्यांची मंजुरीही घेण्यात आली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांनी जाहीर सभांमधूनही या प्रकल्पाचा उल्लेख केला होता. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात थीमपार्कसाठी तरतूद नसल्याने हा प्रकल्प मागे पडल्याचे दिसत आहे. 

रेसकोर्सची 75 टक्के जमीन सरकारची आहे. त्यामुळे "ना हरकत प्रमाणपत्रा'साठी पालिकेने 2013 मध्ये सरकारकडे प्रस्ताव पाठवला. मात्र, सरकारने अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. गेल्या विधानसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यात थीमपार्क उभारण्याचे सुतोवाच केले होते. आगामी निवडणुकांतही शिवसेना हा प्रकल्प प्रचाराचा मुद्दा करण्याची शक्‍यता आहे. पण प्रकल्प प्रलंबित राहिल्याने आता त्याचे श्रेय शिवसेनेला घेता येणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com