... तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पावसाचा जोर लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आम्ही उद्यान बंद ठेवल्याची माहिती मुख्य संरक्षक आणि संचालक अन्वर अहमद यांनी दिली.

मुंबई : मुसळधार पावसाच्या सरींमुळे बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बंद ठेवण्यात आले आहे. उद्यानातील वनाधिकारी कार्यालयात तसेच उद्यानातील कृष्णगिरी उपवन भागांतील पुलाजवळही पाणी आले होते. 

पावसाचा जोर लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आम्ही उद्यान बंद ठेवल्याची माहिती मुख्य संरक्षक आणि संचालक अन्वर अहमद यांनी दिली. उद्यानातील वनअधिकारी कार्यालयातही एक ते दीड फुटांपर्यंत पाणी साचले होते. मात्र, हे पाणी काही मिनिटांसाठीच साचल्याने कोणतेही नुकसान झाले नाही, अशी माहिती अहमद यांनी दिली.

उद्या रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टीनिमित्त अनेक पर्यटक उद्यानास भेट देण्यास येण्याची शक्यता आहे. जर उद्या (ता.4) पावसाची संततधार कायम राहिली, तर उद्यान बंद ठेवले जाईल, अशी माहितीही अहमद यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Then Sanjay Gandhi National Park will be closed