सरकारी योजनांचा सुकाळ, आदिवासींच्या नशिबी दुष्काळ

भगवान खैरनार
शुक्रवार, 4 मे 2018

मोखाडा (पालघर) : स्वातंत्र्याची 70 आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेची 58 वर्षे होऊनही आदिवासींच्या नशिबी अंधारच आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येक गाव - खेडे विद्युतीकरण केल्याचा दावा केला आहे. मात्र, मोखाडा तालुक्यातील 11 पाडे आणि तब्बल 7624 आदिवासींच्या घरात विजच, पोहोचलेली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गाव - खेडे पाॅवर ग्रीडशी जोडले गेल्याचा दावा सपशेल खोटा ठरला असून, सरकारी योजनांचा सुकाळ, आणि आदिवासींच्या नशिबी दुष्काळ असे म्हणण्याची वेळ आदिवासींवर आली आहे. 

आघाडी सरकारने प्रत्येक गाव - खेडे विद्युतीकरण करण्यासाठी राजीव गांधी विद्युतीकरण योजना अंमलात आणली होती. मात्र, त्यानंतर केंद्रात सरकार बदलले आणि योजनेचे नाव ही बदलले. मोदी सरकारने पंडीत दीनदयाळ उपाध्याय विद्युतीकरण योजना अस्तित्वात आणली. या योजनेंतर्गत प्रत्येक गाव - खेड्यात विद्युतीकरण आणि 24 तास विज पुरवठा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यानुसार पालघर जिल्हयातील आदिवासी खेड्यापाड्यांमधील विद्युतीकरणासाठी तब्बल 453 कोटी रूपये मंजूर झाल्याची माहीती तत्कालीन खासदारांनी पत्रकारांना सन 2017 मध्ये दिली होती. या योजनेतून किती गाव - खेडे उजळली हे गुलदस्त्यात आहे.

केंद्र शासनाची ही योजना पालघर जिल्हयातील मोखाडा तालुक्यात सपशेल अपयशी ठरली असून कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे. मोखाड्यातील कोलेधव, वांगणपाडा, चिकाडीपाडा, जांभळीपाडा, रूईचापाडा, तुळ्याचीवाडी, जंगलवाडी, वंगनपाडा, पोर्याचापाडा, बहीरोबाचीवाडी आणि गणेशवाडी या 11 पाडयांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष व राज्य स्थापनेची 58 वर्षे होऊनही , हे गाव - खेडे अंधारात चाचपडत आहेत. येथील आदिवासींच्या नशिबी पिढ्यानपिढ्या अंधाराच आला आहे. 

एवढे कमी की काय, राज्य शासनाने हर घर बिजली सौभाग्य योजना आणली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक गाव - खेड्यातील घरात , विज पोहेचविण्याचे ऊद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. या योजनेच्या सरकारी सर्व्हेक्षणा नुसार मोखाडा तालुक्यात गावठाण क्षेत्रात - 6763  तर  गावठाण सदृश्य क्षेत्रात 861 असे एकूण 7684  कुटुंबे अंधारात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून करण्यात आलेली पाॅवर ग्रीडशी गाव - खेडे जोडल्याचा दावा सपशेल खोटा ठरला आहे. 

आम्हाला निवडणूकीच्या काळात विद्यमान आमदार तसेच तत्कालीन खासदार यांनी विद्युतीकरण करण्याबाबत बाबत केवळ आश्वासने दिली आहेत. आम्हाला विज मिळून देतो म्हणून, महावितरण  च्या कर्मचार्यांनी पैसे घेऊन आमची फसवणूक ही केली आहे. मात्र, गावात विज आलेली नाही. आमचे मुलं पणती , दिवा आणि कंदिलाच्या मिणमिणत्या ऊजेडात आपले जीवन घडवत आहेत. गेली 15 वर्षापासून विजेचे खांब आमच्या गावात ऊभे आहेत. अनेक विनंत्या करून ही आमच्या नशिबी अंधारच आला आहे. 
* - हरिष शिंदे, ग्रामस्थ, पोर्याचापाडा. 

Web Title: there are a lot of government schemes but no use for tribal