गणेश मिरवणुकीत अडथळे नाहीत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मुंबादेवी : मेट्रोच्या कामामुळे गणेश मिरवणुकांच्या मार्गात अडथळे येऊ नयेत यासाठी 26 ऑगस्टपर्यंत दक्षिण व मध्य मुंबईतील मेट्रो कामांची बॅरिकेड्‌स चार फूट मागे हटविण्याचा निर्णय आज घेण्यात आला. ही बॅरिकेड्‌स मागे गेल्यावर तेथे पडलेले खड्डेही बुजवले जाणार आहेत. 

मुंबादेवी : मेट्रोच्या कामामुळे गणेश मिरवणुकांच्या मार्गात अडथळे येऊ नयेत यासाठी 26 ऑगस्टपर्यंत दक्षिण व मध्य मुंबईतील मेट्रो कामांची बॅरिकेड्‌स चार फूट मागे हटविण्याचा निर्णय आज घेण्यात आला. ही बॅरिकेड्‌स मागे गेल्यावर तेथे पडलेले खड्डेही बुजवले जाणार आहेत. 

मेट्रोच्या कामांमुळे मिरवणुकांवर काय परिणाम होईल याची पाहणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मेट्रो, एमएमआरडीए, महापालिका व रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज केली. या वेळी गिरगावातील जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, लॅमिंग्टन रोड, गिल्डर लेन, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल, नायर हॉस्पिटल, जेकब सर्कल, वरळी नाका, डॉ. एनी बेझंट रोड, गोखले रोड, रानडे रोड, शितला देवी परिसर येथे ही पाहणी करण्यात आली. येथे गणेश मिरवणुकांसाठी 22 ते 24 फूट रुंद रस्ता लागेल, असे आढळून आले. त्यामुळे येथील बॅरिकेड चार फूट मागे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे पडलेले खड्डेही तत्काळ बुजवले जातील. त्यामुळे मिरवणुकांसाठी पुरेशी जागा मिळेल, असेही मत व्यक्त करण्यात आले. 

एकदिशा मार्गाचाही पर्याय 
या महिन्याच्या चौथ्या रविवारी म्हणजे 26 ऑगस्टला अनेक गणेश मंडळे आपल्या मूर्ती मंडपात आणतील. त्यापूर्वी ही व्यवस्था केली जाईल आणि त्यामुळे त्याच दिवशी ही व्यवस्था पुरेशी आहे किंवा नाही हे तपासता येईल. त्यामुळे त्यानंतर गणेशमूर्ती आणताना बदल करता येईल, असेही सुचविण्यात आले. शक्‍य असेल तर काही ठिकाणी एकदिशा मार्गही केला जाईल. तसेच शक्‍यतो सुटीच्याच दिवशी मिरवणुका आणल्या जाव्यात, त्या दिवशी वाहनांची संख्या कमी असल्याने मिरवणुकांना फारसे अडथळे होणार नाहीत, असेही सुचविण्यात आले. उपनगरांमधील पाहणीही लवकरच करण्यात येणार आहे. 

Web Title: There are no obstacles in Ganesh rally