म्युकरमायकोसिसच्या औषधवाटपात भेदभाव नाही; मुंबई हायकोर्टात केंद्राचे उत्तर

म्युकरमायकोसिसच्या औषध वाटपाबाबत राज्यांमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही, आणि ज्याप्रमाणे गरज असते त्याच प्रमाणात वाटप केले जाते.
Mumbai High Court
Mumbai High CourtSakal

मुंबई - म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) औषध वाटपाबाबत (Drug Distribution) राज्यांमध्ये कोणताही भेदभाव (Discrimination) केला जात नाही, आणि ज्याप्रमाणे गरज असते त्याच प्रमाणात वाटप (Distribute) केले जाते, असा खुलासा केंद्र सरकारच्या (Central Government) वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) करण्यात आला. दरम्यान, राज्यात सध्या 7511 रुग्ण या आजाराने ग्रस्त आहेत तर मागील आठवड्यात 75 जणांचा म्रुत्यु झाला आहे. (There is no Discrimination in the Drug Distribution of Mucormycosis Centres Reply in Mumbai High Court)

राज्यात म्यकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीचे रुग्ण वाढत आहेत. ता. 15 पर्यंतच्या आकडेवारीनुसार 7511 रुग्ण असल्याची माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली. प्रत्येक राज्याला तेथील रुग्णांच्या प्रमाणात एम्फोटेरिसीन बी औषध मिळायला हवे. त्यामुळे महाराष्ट्रात अधिक पुरवठा हवा, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. यावर आज केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनील सिंह यांनी माहिती दिली. ज्या प्रमाणात औषध उपलब्ध होत आहे त्याप्रमाणात राज्यांना औषध पुरविण्यात येत आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयदेखील यावर देखरेख ठेवत आहे, असे सिंह यांनी सांगितले. औषधांसाठी सहा औषध कंपन्यांना परवाना देण्यात आला आहे. अमेरिकेतून औषधे आयात करण्यासाठी हा परवाना आहे. राज्य सरकारला केंद्राकडून दर दिवशी पंधरा हजार वायल्स दिल्या जातात. तर देशभरात 670000 कुप्या वितरित होतात. महाराष्ट्रात आतापर्यंत 140260 कुप्या दिल्या आहेत असे सिंह यांनी स्पष्ट केले.

Mumbai High Court
आशावर्कर्सना वेतनवाढ, कोरोनाकाळात वाढीव मोबदला देण्यास नकार

राज्यातील रुग्ण संख्येनुसार महाराष्ट्राला रोज 17500 कुप्या आवश्यक आहे. हाफकिन बायोबरोबर केलेल्या करारानुसार 40000 कुप्या जून 18 ते जून 30 पर्यंत मिळू शकतील, असे कुंभकोणी यांनी सांगितले. हाफकिन चे उत्पादन ता. 10 पर्यंत मिळणे अपेक्षित होते, मात्र स्टेरलाईज प्रक्रियेमुळे त्याला विलंब होत आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या वतीने एड अनील साखरे यांनी न्यायालयात माहिती दिली. मुंबईमध्ये सध्या काळ्या बुरशीचे 282 सक्रिय रुग्ण आहेत. न्या एस पी देशमुख आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य आणि केंद्र सरकार ला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले असून सुनावणी ता. 25 पर्यंत तहकूब केली.

https://www.esakal.com/desh/old-woman-raped-stabbed-25-times-by-man-half-her-age-in-delhi

https://www.esakal.com/mumbai/rape-on-women-police-officer-in-mumbai-files-fir

https://www.esakal.com/mumbai/shockin-rape-on-model-in-mumbai-booked-nine-perosn

https://www.esakal.com/mumbai/mumbai-fir-has-been-registered-against-three-accused-for-raping-a-female-police-officer

मारणेची सुटका करण्यासाठी त्याची पत्नी जयश्री मारणे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर न्या प्रसन्ना वराळे आणि न्या सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. कोरोनामध्ये निर्बंध झुगारून मिरवणूक काढल्याबद्दल खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकार सुरक्षितता पाळायला सांगत आहे, आणि तुम्ही मिरवणुका काढता, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे न्यायालयाने सुनावले. न्यायालयाने याचिकेवर राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले असून सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com