भाजप-सेना युतीमुळे राज्याचा विकास खुंटला : दयानंद किरतकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

डोंबिवली : हिंदुस्थान म्हणून मतांचा जोगवा मागणाऱ्या भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पक्षाचे नाव हिंदुस्थान जनता पक्ष असे का ठेवले नाही? अशी परखड टीका करत बहुजन समाज पार्टीचे (बसपा) प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी भाजपा व सेना यांच्या बेगडी हिंदुत्वाची पोलखोल केली. कल्याण डोंबिवली पत्रकार संघातर्फे आयोजित 'दिलखुलास संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते.

डोंबिवली : हिंदुस्थान म्हणून मतांचा जोगवा मागणाऱ्या भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पक्षाचे नाव हिंदुस्थान जनता पक्ष असे का ठेवले नाही? अशी परखड टीका करत बहुजन समाज पार्टीचे (बसपा) प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी भाजपा व सेना यांच्या बेगडी हिंदुत्वाची पोलखोल केली. कल्याण डोंबिवली पत्रकार संघातर्फे आयोजित 'दिलखुलास संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजप-शिवसेना युतीत असून ही राज्याचा विकास खुंटवलेला आहे. बहुजन व मागसवर्गीयांचे जगणे कठीण झाले असून दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. याची तिळमात्र कल्पना सत्ताधाऱ्यांना नाही ही शोकांतिका आहे. भारतामध्ये सर्वाधिक मते मिळविणारा तिसऱ्या क्रमांकाचा बसपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील 85 वस्त्यांमध्ये स्वच्छता गृह, पायवाटा, पथदिवे यांसह आरोग्याची महाभयंकर स्थिती असून या महापालिकेला त्याचे सोयर सुतक नाही. आमचा पक्ष रस्त्यावर उतरून कधीच आंदोलन करीत नाही म्हणजे आम्हाला भावना नाही, नागरी प्रश्नांची जाण नाही असे कोणी समजू नये. रस्त्यावर उतरून राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे हे आमचे उद्दिष्ट नसून पक्षाचे श्रद्धस्थान कांशीराम व पक्षाध्यक्षा मायावती यांनी अशी शिकवण दिलेली नाही.

कल्याण डोंबिवली महापालिकेचा विचार करता सार्वजनिक शौचालय, आपत्कालीन व्यवस्था, धोकादायक इमारतींचा प्रश्न यांसह मनोरंजनाच्या सुविधांचा अभाव येथे आढळतो. डोंबिवलीच्या पश्चिमेला तर दडपशाही व गुंडगिरी यामुळे सर्व सामान्य नागरिक दडपणाखाली आहेत. कायदा सुव्यवस्था धाब्यावर कशी बसवली जाते याचे उदाहरण सांस्कृतिक नगरीत बघायला मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी जे घटनात्मक अधिकार दिले आहेत, त्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. परंतु या महापालिकेत संविधान बासनात गुंडाळून ठेवले आहे का? अशी टीका त्यांनी केली. 

यावेळी युग फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरतकर यांनी त्यांच्या कामाची माहिती सांगतली. शिक्षणासाठी गरजूंना आवश्यक ती सर्व मदत करीत राहणार असून, महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणासाठी युग फाउंडेशन सज्ज आहे. ज्या महिलांना सामाजिक बांधिलकी जपत रोजगार हवा आहे त्यांनी युग फाउंडेशनला संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: There is no development in BJP- Shiv Sena government in state : Dayanand Kiratkar