esakal | सोनिया गांधींनी पाठवलेल्या पत्रात कोणतेही दबावाचे राजकरण नाही : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

सोनिया गांधींनी पाठवलेल्या पत्रात कोणतेही दबावाचे राजकरण नाही : संजय राऊत

सोनिया गांधींनी लिहलेले पत्र महाराष्ट्राचे नागरीक आणि राज्याच्या हिताचे असल्याने त्याचे स्वागत करायला हवे. अशी भुमिका शिवसेेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.

सोनिया गांधींनी पाठवलेल्या पत्रात कोणतेही दबावाचे राजकरण नाही : संजय राऊत

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात कोणतेही दबावाचे राजकरण नाही.हे पत्र महाराष्ट्राचे नागरीक आणि राज्याच्या हिताचे असल्याने त्याचे स्वागत करायला हवे.अशी भुमिका शिवसेेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.

मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोनिया गांधी यांनी उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी लागणार निधी द्यावा अशी मागणी करणारे पत्र पाठवले आहे.त्यावर शिवसेनेकडून संजय राऊत यांनी भुमिका मांडली आहे.राऊत म्हणाले,‘ महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबरच युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचेही योगदान आहे.हे सरकार स्थापन करताना किमान सामान कार्यक्रम ठरविण्यात आला आहे.

महाभारतातल्या संजयच्या दिव्यदृष्टीचा सेनेच्या आधुनिक संजयचा अविर्भाव; प्रसाद लाड यांचा टोला

दलित शोषित सगळ्यांसाठी काम करायचे ठरले आहे.सरकारही त्याच मार्गावर काम करत आहे.काही मुद्दे मागे राहीले असतील.त्याचे कारण कोविड आहे.सर्व सरकारी यंत्रणा कोविड प्रतिबंध आणि उपाय योजनांमध्ये गुंतलेली होती.आता सर्व सुरळीत होत आहे.किमान समान कार्यक्रमावर काम सुरु होईल.यात कोणतेही दबवाचे राजकर नाही.हे पत्र जनता आणि महाराष्ट्राच्या हितासाठीच आहे.त्यामुळे त्याचे स्वागत करायला हवे.

There is no politics of pressure in the letter sent by Sonia Gandhi said Sanjay Raut

--------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )