रांगांतून नागरिकांना दिलासा नाहीच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

मुंबई - पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात नोटा बदलून घेण्यासंदर्भात किंवा नवीन नोटा स्वीकारण्याबाबत नागरिकांच्या बॅंकांसमोरील रांगा अजूनही कमी झालेल्या नाहीत. नोटा बदलून घेणाऱ्या खातेदारांच्या बोटाला शाई लावण्याबाबतही गोंधळ कायम राहिला.

राज्यातील अनेक भागात अद्याप नवीन नोटा पोचल्या नसल्याने नवीन नोटांबाबत नागरिक बॅंकांना विचारणा करत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीईकृत बॅंकांचे काही ठिकाणी एटीएम सुरू होत असले, तरी ते काही तासांतच रिकामे होत असल्याने नागरिकांना पैशांसाठी बॅंकेची वाट धरावी लागत आहे. आजपासून बोटांना शाई लावण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर अनेक ठिकाणी शाई न पोचल्याने बॅंकांनी नोटा वितरित केल्या नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नोटांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत असतानाच नागरिकांना नव्याने अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: There is no relief to the citizens of rows